BMC Election 2026: सर्वोच्च न्यायालयाने 2022 पूर्वीच्या परिस्थितीनुसार निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेसह सर्व पालिकांच्या निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. राज्यातील महापालिकेसाठी यंदा 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. (Mahanagarpalika election Date)
Municipal Election 2026 राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने सर्व राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. त्यामुळे भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षासह सर्व पक्ष आपल्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात रिंगणात उतरले आहे. आता मतदानाला अवघे 4 दिवस बाकी असल्याने राजकीय पक्षांकडून सभांचा धडाका सुरु आहे. चला या सगळ्या बातम्यांची क्षणाक्षणांची अपडेट घेत राहू….
राज आणि उद्धव ठाकरे यांचे सभा लाईव्ह -
- 2026-01-11 21:30:38
Uddhav Thackeray Rally : भाजपाचे हिंदुत्व हे ढोंग - उद्धव ठाकरे
भाजपाचे हिंदुत्व हे ढोंग आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. - 2026-01-11 21:20:23
Uddhav Thackeray Rally Mumbai: उद्धव ठाकरे यांचे फडणवीस यांना खुलं आवाहन
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुल आवाहन दिलं आहे. ते म्हणाले, मोदी आणि तुमचं एक तरी भाषण हिंदू मुस्लिम हा मुद्दा नसलेलं दाखवावं, असं म्हणाले. - 2026-01-11 21:09:29
Raj Thackeray- दुबार मतदार आला तर तिकडेच फोडून काढा - राज ठाकरे
दुबार मतदार आला तर तिकडेच फोडून काढा - राज ठाकरे तामिळनाडुतून रसमलई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय, भ...व्या तुझा काय संबंध इथं यायचा. यासाठीच बाळासाहेब बोलले होते हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. तुम्हाला कबुतरांच्या नावाने भडकावलं जातंय. कबुतरं बाजूला राहिली पण सत्ताधारी फडफडतायत. जैन मुनी काय सांगतायत जैन आणि मराठी यांच्यातला वाद सोडवण्याची जबाबदारी लोढांवर फडणवीस यांनी दिली पण लोढांनी जैन मराठी वाद वाढेल यासाठी प्रयत्न झाला, असं राज ठाकरे म्हणाले. - 2026-01-11 21:11:09
राज ठाकरे यांचा लाव रे तो व्हिडिओ
आपल्या भाषणात लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी 2014 ते 2024 या गेल्या 10 वर्षात उद्योगपती गौतम अदानींच्या वाढलेल्या संपत्तीचा लेखाजोखाच मांडला. - 2026-01-11 21:04:40
आज जर चुकला तर संपलात समजा - राज ठाकरे
आज जर चुकला तर संपलात समजा - राज ठाकरे - 2026-01-11 21:05:07
तिकडून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली - राज ठाकरे
मी आणि उद्धव एकत्र आलो याचं कारण मुंबईवर आलेलं संकट. मी अनेक वर्षांपासून बोलत आलो, की कशा प्रकारे डाव रचला जातो आहे. हिंदी सक्तीचा विषय आणल्यानंतर मी पण कडाडलो. उद्धवही कडाडला. मी त्याआधीच म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिकडून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. सविस्तर वाचा - - 2026-01-11 20:35:50
Raj Thackeray Mumbai Rally News: राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा
तुळजापुरात ड्रग्ज रॅकेटमधील एकाला भाजपाने तिकीट दिलं. बलात्काराचा आरोप असलेला माणूस तुषार आपटे याला भाजपाने नगरसेवक केलं, असं राज ठाकरे म्हणाले.
- 2026-01-11 20:32:16
हिंदी भाषेचा विषय हा फक्त तुम्हाला चाचपणे हा होता,
हिंदी भाषेचा विषय हा फक्त तुम्हाला चाचपणे हा होता, असं राज ठाकरे म्हणाले. - 2026-01-11 20:29:12
Raj Thackeray Rally Mumbai: राज ठाकरे यांना बाळासाहेबांचा आठवण
आज बाळासाहेब, प्रबोधकार आणि आमच्या माँ असायला हव्या होत्या, अशी आठवण यावेळी राज ठाकरे यांनी केली. - 2026-01-11 20:27:52
Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. - 2026-01-11 20:26:49
मुंबईचा महापौर ठाकरे बंधु ठरवतील - जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचा राज- उद्धव यांना पाठिंबा आहे. मुंबईचा महापौर ठाकरे बंधु ठरवतील असं जयंत पाटील म्हणाले.
- 2026-01-11 20:14:14
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे व्यासपीठावर दाखल
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे व्यासपीठावर दाखल झाले आहेत.
- 2026-01-11 20:05:32
Thackerey Rally: लावरे तो फोटो म्हणत आदित्य ठाकरे यांची फडणवीसांवर टीका
आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या श्रेयवादावर टीका केली. यावेळी त्यांनी लावरे तो फोटो म्हणतं फडणवीस यांच्यावर टीका केली.
- 2026-01-11 20:02:46
आदित्य ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका
आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घणाघाती टीका केली आहे. तसेच, त्यांनी मागील काही वर्षात मुंबईत केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या शिक्षणाची माहिती दिली. आदित्य ठाकरे म्हणाले ही निवडणूक शहराच्या विकासाची आहे. - 2026-01-11 19:32:48
PCMC Election News: पिंपरी-चिंचडवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान लागली आग
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान एका इमारतीच्या टेरेसवर असलेल्या टॉवरला आग लागल्याची घटना समोर आली आहे. रॅलीमध्ये फटाके फोडण्यात आले होते या फटाक्यामुळे आग लागली असावी, असे म्हणणे आहे. - 2026-01-11 19:28:14
भाजपा महायुतीचा जाहीरनामा नव्हे ‘फेकूनामा’ - वर्षा गायकवाड
भाजपा महायुतीचा जाहीरनामा नव्हे ‘फेकूनामा’ मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या भारतीय जनता पक्ष महायुतीचया जाहिरनाम्यात दिलेला एकही शब्द ते पाळणार नाहीत. महापालिकेतील ९० हजार कोटींच्या बँक ठेवी लुटून खाणारे, मुंबईतील महत्वाच्या ठिकाणची हजारो एकर जमीन लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालणारे, बेस्टचे खाजगीकरण करणारे भाजपा शिंदेसेना मुंबईकरांचा विकास करणार नाहीत. भाजपा महायुतीचा जाहीरनामा नाही तर तो ‘फेकूनामा’ आहे, अशी घणाघाती टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. - 2026-01-11 19:18:36
Uddhav thackeray Rally उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी दाखल
उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी दाखल झाले आहेत. - 2026-01-11 19:05:52
BMC Election: अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस - अभिजीत पानसे
मुंबई: मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले, "आज आमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे. मुंबईतील शिवतीर्थावर, जिथे बाळासाहेबांनी गेल्या ५० वर्षांपासून भाषणे देऊन देशाला हादरवून सोडले, त्याच ठिकाणी आता आदरणीय राज आणि उद्धव साहेब यांच्या जाहीर सभेचे आयोजन होणार आहे." - 2026-01-11 18:17:16
Raj Thackray Rally: मराठी माणसाला बळ देणारी शिवशक्ती!
मराठी माणसाला बळ देणारी शिवशक्ती! असं ट्वीट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केले आहे. - 2026-01-11 17:43:38
जालनाचे लोक एआयएमआयएमच्या उमेदवारांना निवडून देतील - असदुद्दीन ओवैसी
जालन्यात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "जालनाचे लोक एआयएमआयएमच्या उमेदवारांना निवडून देतील... अल्पसंख्याक मुस्लिम समाजाविरुद्ध या लोकांनी आपल्या बोलण्यातून दाखवलेला द्वेष आता उघड झाला आहे..." - 2026-01-11 17:33:20
भाजपाचा बेटी बचाव, बेटी पढाव, हा केवळ पोकळ नारा - हर्षवर्धन सपकाळ
भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणते पण ते वस्तुस्थिती तशी नाही. भाजपात गुंड, मवाली, माफिया यांना आमदार, खासदार, मंत्री केले जाते, आता तर भाजपा बलात्काऱ्यांनाही पक्षात संधी देत आहे. बदलापूरमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपाने स्विकृत नगरसेवक करून विकृतीचा कळस गाठला आहे, असा घणाघाती हल्लाबोल करत भाजपाचा बेटी बचाव, बेटी पढाव, हा पोकळ नारा असून खरे तर भाजपापासून बेटी बचाव असे चित्र आहे असे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना रविवारी पनवेल मध्ये प्रचार केला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली. - 2026-01-11 17:00:24
संजय राऊतांच्या विधानावर फडणवीसांचा पलटवार, म्हणाले ही पोकळ धमकी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांच्या "10 मिनिटांत मुंबई बंद करा" या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी या विधानाला "पोकळ धमकी" म्हटले आहे, असे म्हटले आहे की परिस्थिती बदलली आहे आणि अशी विधाने केवळ भाषणांपुरती मर्यादित आहेत. यावर आता एका वृत्तवाहिनीच्या पॉवर प्ले कार्यक्रमात बोलताना संजय राऊत म्हणाले की, ठाकरे कुटुंब कधीही नष्ट होऊ शकत नाही. त्यांनी दावा केला की, "आजही आपण 10 मिनिटांत मुंबई बंद करू शकतो." राऊत यांचे विधान महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबाच्या शक्तीचे प्रदर्शन म्हणून पाहिले जाते, विशेषतः अलिकडच्या निवडणुकीत पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. - 2026-01-11 15:50:36
BMC Election News: बनावट जन्म दाखला घोटाळ्याची संपूर्ण चौकशी केली - फडणवीस
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणलेल्या बनावट जन्म दाखला घोटाळ्याच्या बाबतीत आम्ही संपूर्ण चौकशी केली असून, यात सामील असलेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. नजरकैद केंद्राबाबत बोलायचे झाल्यास, आम्ही जमीन संपादित केली असून, तेथे आवश्यक काम सुरू आहे." - 2026-01-11 14:31:22
लोक महायुतीच्या महापौरांना निवडून देतील - खासदार मिलिंद देवरा
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) खासदार मिलिंद देवरा यांनी बीएमसी निवडणूक जाहीरनाम्याबद्दल बोलताना सांगितले की, "मुंबईकरांच्या चिंता आणि आकांक्षांबद्दल त्यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली, आणि लोकांना दिसले आहे की महायुतीने मुंबईसाठी, मग ते गृहनिर्माण असो, रोजगार असो किंवा महिला सक्षमीकरण असो, काम करून दाखवले आहे. त्यामुळे मला खात्री आहे की लोक महायुतीच्या अशा महापौरांना निवडून देतील, जे काम करून दाखवतील आणि विकास सुनिश्चित करतील." - 2026-01-11 14:30:41
BMC Election 2026: देवेंद्र फडणवीस यांची मुंबईकरांना आश्वासने
आम्ही 5 वर्षांनंतर जनतेसमोर आमचे रिपोर्ट कार्ड सादर करू आणि आम्ही काय साध्य केले आहे ते दाखवू. आम्ही मराठी माणसांना मुंबई सोडून जाऊ देणार नाही; आम्ही त्यांना इथेच घरे देऊ. काही लोक फक्त मराठी माणसांच्या घरांबद्दल बोलतात, पण महायुती काम करून दाखवते, राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांची मुंबईकरांना आश्वासने आम्ही विकासकांची नियुक्ती करू, आणि जर त्यांनी काम केले नाही, तर म्हाडा ती जबाबदारी घेईल. आम्ही झोपडपट्टीत राहणाऱ्यांना, पदपथावर राहणाऱ्यांना आणि बीएमसीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरे देऊ. आम्ही बीएमसीच्या शाळांना कौशल्य-आधारित बनवू आणि मराठी भाषा शिकण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करू. आरोग्य विभागाने उत्तम काम केले आहे; आम्ही त्यात आणखी सुधारणा करत राहू. आम्ही 2000 खाटांची भर घालत आहोत आणि मुंबईत रोजगार निर्माण करत आहोत. आम्ही 2026 सालापर्यंतच्या लोकसंख्येसाठी पाणीपुरवठा सुनिश्चित करू आणि नद्यांमधील सांडपाणी थांबवू. नद्या स्वच्छ करण्यासाठी आणि मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रतिष्ठित प्रकल्पांसाठी 16,000 कोटी रुपये. आम्ही मेट्रो, वॉटर टॅक्सी आणि शाश्वत वाहतुकीवर काम करू. सर्व प्रवासाच्या गरजांसाठी एकच 'वन मुंबई' ॲप. आम्ही रस्त्यांवरील गर्दी कमी करू, द्रुतगती मार्ग बांधू आणि मुंबईला खड्डेमुक्त करू. महिलांना बस प्रवासात 50% सवलत आणि भगिनींसाठी 1 लाख रुपयांचे कर्ज. आम्ही सुरक्षित शहरासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करू आणि मुंबईला स्मार्ट बनवू! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आमचे मार्गदर्शक असतील. आम्ही बीएमसीमध्ये बदल घडवून आणू आणि मुंबईतील सर्व महिलांसाठी काम करू. - 2026-01-11 14:05:26
Raj Thackeray Rally: राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन, आज सायंकाळी 6.30 वाजता
महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र, आज सायंकाळी 6.30 वाजता शिवतीर्थावरती, महाराष्ट्र धर्माची पताका गाजवत, उत्साहात या ! - 2026-01-11 14:03:41
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कुटुंब पक्ष उदयास - पूनम महाजन
भाजप नेत्या पूनम महाजन म्हणाल्या, "लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष असतात, पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कुटुंब पक्ष उदयास येत आहेत..."मुंबई, महाराष्ट्र: बीजेपी नेता पूनम महाजन ने कहा, "लोकतंत्र में राजनीतिक पार्टियां होती हैं, लेकिन महाराष्ट्र में कई जगहों पर पारिवारिक पार्टियां होती जा रही हैं..." pic.twitter.com/x14C3f2Iix
— IANS Hindi (@IANSKhabar) January 11, 2026 - 2026-01-11 14:00:45
मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी 17,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार - एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे म्हणाले, "महायुती सरकारने कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची दूरदृष्टी आजही कायम आहे. आमचा विकास मराठ्यांसाठी आहे. आम्ही त्यांच्यासाठी मल्टिप्लेक्स थिएटर्स बांधणार आहोत! मराठ्यांनो, आम्ही तुमच्यासाठी दहापट अधिक काम करू... मुंबईला तिच्या लोकांकडे परत आणण्याची गरज आहे. झोपडपट्टीमुक्त मुंबई हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. आम्ही घाटकोपरमध्ये 17000 लोकांसाठी एसआरए प्रकल्पावर काम करत आहोत. 30-35 लाख घरे बांधण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही मुंबईला फिनटेक सिटी, फिनटेक राजधानी बनवू. आम्ही जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन करत आहोत. बेस्टमध्ये आम्ही महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी आम्ही 17,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. आम्ही सर्व रस्ते मजबूत करू आणि मुंबईला खड्डेमुक्त करू." सविस्तर वाचा - - 2026-01-11 12:48:28
माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शिंदेसेनेत प्रवेश
शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा राजीनामा देऊन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.Mumbai, Maharashtra: Former Shiv Sena MLA Dagdu Sakpal quit Shiv Sena (UBT) and joined the Deputy Chief Minister Eknath Shinde-led Shiv Sena in his presence pic.twitter.com/EHlHQIyTcb
— IANS (@ians_india) January 11, 2026 - 2026-01-11 12:47:03
BMC Election 2026 MahaYuti Manifesto: महायुतीचा बीएमसी निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुती आगामी बीएमसी निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.Mumbai, Maharashtra: The Maha Yuti is set to release its manifesto for the upcoming BMC elections in the presence of Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Eknath Shinde. pic.twitter.com/p76dqkdjHv
— IANS (@ians_india) January 11, 2026 - 2026-01-11 12:43:58
Maithili Thakur in Mumbai: मैथिली ठाकूर मुंबईत म्हणाल्या
मुंबईतील दहिसरमध्ये प्रभाग क्रमांक 1 च्या उमेदवार रेखा राम यादव यांच्या रोडशोदरम्यान भाजप आमदार मैथिली ठाकूर म्हणाल्या, "मी उमेदवार रेखा यादव यांच्यासोबत उभी आहे. मी येथे उपस्थित सर्वांना आवाहन करते की, या भागाच्या कन्येला सेवेची संधी द्या..."Mumbai, Maharashtra: On Ward 1 candidate Rekha Ram Yadav’s roadshow in Dahisar, BJP MLA Maithili Thakur says, "I stand with candidate Rekha Yadav. I appeal to everyone here to give the daughter of this area a chance to serve..." pic.twitter.com/2YRtKCF244
— IANS (@ians_india) January 11, 2026 - 2026-01-11 12:33:12
BMC Election 2026 LIVE: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा-महायुतीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन
LIVE | बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा-महायुतीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन -LIVE | बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा-महायुतीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 11, 2026
🕛 दु. १२.०३ वा. | ११-१-२०२६📍मुंबई. @BJP4Maharashtra @BJP4Mumbai#Maharashtra #MunicipalCorporationElection #बृहन्मुंबई_महानगरपालिका https://t.co/c9wknENGEY
