जेएनएन, ठाणे. Thane Latest News: ठाणे जिल्ह्यातील एका 16 वर्षीय मुलाने त्याच्या वडिलांनी मोबाईल फोनवर गेम खेळण्यास मनाई केल्याने आणि ते मोबाईल फोन हिसकावून घेतल्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
छताला गळफास घेऊन केली आत्महत्या
गुरुवारी अंबरनाथ शहरातील नेवाली गावातील एका चाळीत ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, दहावीच्या अमन साहू या विद्यार्थ्याने त्याचे कुटुंबीय बाहेर असताना घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
फोनवरील गेमचे लागलं होतं व्यसन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या पालकांची त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे अशी इच्छा होती आणि त्यांनी त्याला अतिरिक्त वर्गात प्रवेश दिला होता. मात्र, मुलाला मोबाईल फोनवरील गेमचे व्यसन लागलं होतं. त्यामुळे त्यांनी त्याचा मोबाईल वापर कमी करण्याचा निर्णय घेतला. यातूनच त्यांनी मुलाचा मोबाईल हिसकावून घेतला होता, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - Maharashtra Weather Update: राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, आता या भागाला दिला गारपिटीचा इशारा
अपघाती मृत्यूची नोंद
फोन हिसकावून घेतल्यानं मुलगा नाराज होता, यातूनचं त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांनी सांगितले की, उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.