एजन्सी, नांदेड. Nanded Accident Update: नांदेड शहराजवळ असलेल्या आलेगाव परिसरातून शेजमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाल्यांची भीती व्यक्त करण्यातत येत आहे. ट्रॅक्टरमध्ये शेतकरी महिला मजूर होत्या. त्या हळद काढण्यासाठी जात होत्या, अशी माहिती आहे. सध्या बचाव कार्य सुरु आहे.
Nanded, Maharashtra: A tragic accident occurred in Alegaon village, Nanded district, where a tractor fell into a well while heading to harvest turmeric. Eight people lost their lives, while three were rescued safely with the help of police and locals pic.twitter.com/W12gcPtCYz
— IANS (@ians_india) April 4, 2025
हळद काढण्यासाठी जात असताना
नांदेड शहराजवळच्या आलेगाव शिवरात ही घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातील काही शेतकरी महिला मजूर आलेगाव शिवारात हळद काढायला आल्या होत्या. ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी जात असताना पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी दोन महिलांसह एका पुरुषाला विहिरीतून बाहेर काढले आहे. मात्र अद्याप सात ते आठ जण विहिरीत अडकल्याची माहिती आहे. हिंगोलीसह नांदेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य सुरु आहे.
हेही वाचा - Maharashtra Weather Update: राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, आता या भागाला दिला गारपिटीचा इशारा
आतापर्यंत मृतदेह सापडलेले नाहीत
"बचावकार्य सुरू आहे, आणि आतापर्यंत कोणतेही मृतदेह सापडलेले नाहीत." असे त्यांनी सांगितले, तसेच अधिक माहितीची वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वजणांचा मृत्यू झाल्याची भीती
विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. ट्रॅक्टर मध्ये नेमके किती जण होते, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने इतर सर्वजणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करत आहेत.