जेएनएन, मुंबई. Actor Manoj Kumar Passes Away: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी ज्येष्ठ अभिनेते-चित्रपट निर्माते मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी मुंबईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांनी नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्याची मोठ्या प्रमाणात काम केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
देशभक्तीपर चित्रपटांच्या मालिकेमुळे 'भारत कुमार' म्हणून ओळखले जाणारे मनोज कुमार (87) यांचे वृद्धापकाळामुळे पहाटे 3.30 वाजता कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले.
सिनेसृष्टीतील महान व्यक्तिमत्व हरपले
ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील महान व्यक्तिमत्व हरपले आहे. चित्रपटातून राष्ट्रभक्ती व भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या अष्टपैलू व भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना श्रदांजली वाहिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील महान व्यक्तिमत्व हरपले आहे. चित्रपटातून राष्ट्रभक्ती व भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या अष्टपैलू व भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis pic.twitter.com/5F8EI1mdMi
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 4, 2025
भारतभूमीचा एक सच्चा सुपुत्र हरपला
है प्रीत जहा की रीत सदा
मै गीत वही के गाता हू
भारत का रेहने वाला हू
भारत की बात सुनाता हू...
मेरे देश की धरती, ए वतन ए वतन हम को तेरी कसम, अशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते ज्यांच्यावर चित्रित झाली असे ज्येष्ठ निर्माते, पटकथाकार, दिग्दर्शक, अभिनेते मनोजकुमार म्हणजे सर्वांचे 'भारतकुमार' यांचे आज दीर्घआजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतभूमीचा एक सच्चा सुपुत्र हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज कुमार यांना आदरांजली वाहिली आहे.
आपल्या अभिनय कारकिर्दीत शहीद, पुरब और पश्चिम, हिमालय की गोद मै, हरियाली और रास्ता, रोटी कपडा और मकान, क्रांती अशा विविध सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. आपल्या सिनेमांमधून देशभक्ती, शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसहित भारतीयत्वाची भावना देशवासियांच्या मनात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे क्रांतिकारकांच्या बलिदानाने मिळलेले असून त्यांचा आपल्याला कधीही विसर पडू नये यासाठी त्यांनी आपल्या कलाकृतीमधून लोकांना त्यांची जाणीव करून दिली. त्यांनी केलेल्या सिनेमांमधून बदलत्या भारतीय परिस्थितीचे चित्रण दाखवण्याचा प्रयत्न केला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भारतभूमीला वंदनीय मानणारा हा सच्चा कलावंत आज भारतभूमीच्या कुशीत कायमचा विसावला आहे, असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
है प्रीत जहा की रीत सदा
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 4, 2025
मै गीत वही के गाता हू
भारत का रेहने वाला हू
भारत की बात सुनाता हू...
मेरे देश की धरती, ए वतन ए वतन हम को तेरी कसम, अशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते ज्यांच्यावर चित्रित झाली असे ज्येष्ठ निर्माते, पटकथाकार, दिग्दर्शक, अभिनेते मनोजकुमार म्हणजे सर्वांचे… pic.twitter.com/9iDSmv2lDl
चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेम जागवले. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजातील वास्तव आणि देशासाठी असलेली निष्ठा मोठ्या ताकदीने मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणारी नाही. 'दादासाहेब फाळके', 'पद्मश्री' पुरस्कारप्राप्त असलेले मनोज कुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते, असं उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
हेही वाचा - Manoj Kumar Death: अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, वयाच्या 87 व्या वर्षी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
मनोज कुमार यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी
अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक आणि गीतकार अशा वैविध्यपूर्ण भूमिकेतून भारतीयांना निखळ मनोरंजनाची भेट देणारे भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार मनोज कुमार यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. देशभक्तीने प्रेरित झालेला चित्रपट आणि अभिनय यासाठी ते विशेषत्वाने ओळखले जात. त्यांच्या ’भारत का रहनेवाला हूं, भारत की बात सुनाता हूं।’ या गीतामधील भारतीय संस्कृतीच्या महान परंपरेची ओळख करून देणाऱ्या ओळी आजही मनात रुंजी घालतात. भारतीय चित्रपट आणि कलांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना ’पद्मश्री’ आणि चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ’दादासाहेब फाळके पुरस्काराने’सन्मानित केले होते, असं शरद पवार यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक आणि गीतकार अशा वैविध्यपूर्ण भूमिकेतून भारतीयांना निखळ मनोरंजनाची भेट देणारे भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार मनोज कुमार यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. देशभक्तीने प्रेरित झालेला चित्रपट आणि अभिनय यासाठी ते विशेषत्वाने ओळखले… pic.twitter.com/jQgVoSq98E
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 4, 2025
हेही वाचा - Kesari Chapter 2 Trailer: अक्षय कुमार जालियनवाला हत्याकांडाचे सत्य आणणार समोर, केसरी 2 चा ट्रेलर प्रदर्शित