जेएनएन, कोल्हापूर. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या भाषणात कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे येथील महादेव मंदिराचा आणि बीड जिल्ह्यातील कंकलेश्वर मंदिराचा संदर्भ दिला. यामध्ये शाह यांनी उल्लेख केलेल्या मुद्द्यावर वडणगे येथील महादेव मंदिराच्या जागेवर वक्फने दावा केला होता. जागेच्या मालकी हक्कावरून न्यायालयीन वाद सुरू आहे. हा विषय न्यायप्रविष्ठ असला तरी अमित शाह यांनी या गावचा उल्लेख केल्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात वडणगे गावची चर्चा सुरू झाली आहे. यानंतर वडणगे गावातील नागरिकांनी माध्यमांशी संवाद साधत न्याय देण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थ म्हणतात…
मी अमित शाह यांचे आभार मानतो. त्यांनी आमच्या गावचा मुद्दा संसदेत मांडला. मागील अनेक वर्षापासून गावात एक पुरातन महादेव मंदिर आहे आणि त्यांच्या पाठीमागे एक दर्गा आहे. येथील लोकांनी हा दर्गा वक्फ बोर्डाकडे दिला आणि या परिसरातील महादेवाची यात्रा भरते, या परिसरात त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, अमित शाह यांनी आम्हाला न्याय दावा, अशी येथील विजय जाधव यांनी सांगितलं.
वक्फ बोर्डानं ज्याप्रमाणे जागा हस्तातरण करण्याचा हाट घातला आहे. याविरोधात पहिल्यांदा वडणगे गावात विरोध केला होता. अतिक्रमण हटवण्याच्या मागणी साठी आम्ही गाव बंद केलं होतं. महादेव मंदिर परिसरातील ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण हटवावे आणि ती जागा पुन्हा ग्रामपंचायतीला मिळावावी अशी मागणी खंबीरराव बोडखे यांनी केली आहे.
हेही वाचा - Jalna Cow Killing Case: गायीनं दूध देताना लाथ मारली म्हणून कुदळीनं केली हत्या, गुन्हा दाखल
गावात पोलिस दाखल
वडणगे गावात कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. पोलिसांची गस्त इथं वाढवण्यात आली आहे. गावात सध्या शातंता आहे.