जेएनएन, मुंबई. Ready Reckoner Rate In Mumbai: राज्य सरकारने रेडिरेकनर दरात सरासरी 4.39 टक्कांनी वाढ केली आहे, ही वाढ आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रांत सरासरी 6 टक्के वाढ करण्यात आली आहे. मुंबईत 3.39, पुण्यात 4.16, तर ठाण्यात 7.72 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. मुंबई महापालिका वगळता महापालिका क्षेत्रांत सरासरी 5.95 टक्के वाढ करण्यात आली आहे.
शेवटच्या आठवड्यात दस्त नोंदणीसाठी सर्वच कार्यालयांत गर्दी
रेडिरेकनरच्या दरात वाढ केल्याने मालमत्तांचे दर वाढणार असून, मालमत्ता खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे. रेडिरेकनर दर वाढीची शक्यता असल्याने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दस्त नोंदणीसाठी सर्वच कार्यालयांत गर्दी झाली होती. 31 मार्चला संपणाऱ्या आर्थिक वर्षात 56 हजार कोटींहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.
राज्याची सरासरी वाढ 4.39 टक्के एवढी
राज्यातील ग्रामीण क्षेत्रात 3.36 वाढ करण्यात आली असून नगरपरिषद आणि नगर पंचायत क्षेत्रात 4.97 टक्के, महापालिका क्षेत्रात (मुंबई वगळता) 5.95 टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याची (मुंबई वगळता) सरासरी वाढ 4.39 टक्के एवढी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
बृहमुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 3.39 टक्के वाढ
महापालिका, तसेच नगरपालिका ह्द्दीलगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे, अशा शहरालगतच्या गावांचा समावेश प्रभाव क्षेत्रात करण्यात आला असून तिथे 3.29 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. तर बृहमुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मात्र 3.39 टक्के वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा - Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळी पावसानं पिकाचे मोठं नुकसान, पुन्हा गारपिटीचा अलर्ट
रेडीरेकनरमध्ये राज्यात झालेली सरासरी दरवाढ
क्षेत्र | रेडिरेकनरमधील वाढ (%) |
ग्रामीण क्षेत्र | 3.36 |
प्रभाव क्षेत्र | 3.29 |
नगर परिषद – नगरपंचायत | 4.97 |
महापालिका (मुंबई वगळता) | 5.95 |
मुंबई महापालिका | 3.39 |
राज्याची सरासरी | 3.89 |
शहर | रेडिरेकनरचा दर (%) |
पुणे | 4.16 |
पिंपरी-चिंचवड | 6.69 |
नवी मुंबई | 6.75 |
ठाणे | 7.72 |
कोल्हापूर | 5.01 |
नाशिक | 7.31 |
सोलापूर | 10.17 |
पनवेल | 4.97 |
सांगली-मिरज-कुपवाड | 5.70 |
उल्हासनगर | 9.00 |
छ. संभाजीनगर | 3.53 |
जळगाव | 5.81 |
अहिल्यानगर | 5.41 |
लातूर | 4.01 |
जालना | 4.01 |
परभणी | 4.23 |
अमरावती | 8.03 |
अकोला | 7.39 |
नागपूर | 4.23 |
नागपूर एनएमआरडीए | 6.60 |
चंद्रपूर | 2.20 |
चंद्रपूर म्हाडा | 7.30 |