जेएनएन, मुंबई. Samruddhi Highway Toll News: समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला आज मंगळवारपासून कात्री लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धीवरील पथकरात 19 टक्के वाढ केली आहे.
मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना 1,445 रुपये टोल
परिणामी, कार आणि हलक्या वाहनांना प्रति किमीसाठी सध्याच्या 1.73 रुपयांऐवजी 2.06 रुपये टोल भरावा लागेल. आता मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना 1,445 रुपये टोल द्यावा लागेल. सध्या नागपूर ते इगतपुरी या प्रवासात 1,080 रुपये टोल भरावा लागतो. मात्र, आजपासून 1,290 रुपये टोल भरावा लागेल. एमएसआरडीसीकडून दर तीन वर्षांनी टोलवाढ केली जाते. नवे टोल दर पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत लागू राहतील.
हेही वाचा - BMC Garbage Tax: मुंबईकरांच्या खिशाला कात्री, कचऱ्यासाठी प्रत्येक घराला दरमहा मोजावे लागणार 100 रुपये
किलोमीटरनिहाय किती वाढ होणार
वाहन प्रकार (दर प्रति किमी/रुपये) | सध्या | नवे |
कार, हलकी मोटार वाहने | 1.73 | 2.06 |
हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बस | 2.79 | 3.32 |
बस अथवा दोन आसांचा ट्रक | 2.85 | 6.97 |
तीन आसांची व्यावसायिक वाहने | 6.38 | 7.60 |
अवजड बांधकाम यंत्रसामग्री | 9.18 | 10.93 |
अति अवजड वाहने | 11.17 | 13.30 |