जेएनएन, मुंबई. BMC New Garbage Tax:: मुंबई महानगर पालिकाने घरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरकर्ता शुल्क लागू करणार आहे. सोसायटीमध्ये 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी 100 रुपये दरमहा शुल्क निश्चित करण्यात येणार आहे.

हॉटेल्स, रेस्टॉरंट्ससाठी 1500 रुपये घनकचरा शुल्क

नगर पालिका 100 रुपये दरमाह सोसायटीतील प्रत्येक घरातून करच्या स्वरूपात वसूल करणार आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्ससाठी वेगळे शुल्क लागू करणार आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्ससाठी 1500 रुपये घनकचरा शुल्क आकारले जाणार आहे.

घरासाठी दरमहा 100 रुपये शुल्क 

घनकचरा शुल्क लागू करण्यासाठी महापालिकेने काही सूचना आणि हरकती मागितल्या. यानुसार मुंबई महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क प्रस्तावित करणार आहे. यानुसार 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरासाठी दरमहा 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर निवासी इमारतींसह लग्नाचे हॉल, रेस्टॉरंट, हॉटेल, आदी सर्व आस्थापनांना हे घनकचरा व्यवस्थापन शुल्क लागू होणार आहे. 

    हे शुल्क मालमत्ता करात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव महानगर पालिकाने केले आहे.महापालिकेच्या प्रस्तावानुसार, हॉटेल-रेस्टॉरंटसाठी दीड हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

    अनेक राज्यात घन कचरा व्यवस्थापन शुल्क आकारले जातात

    पुणे महानगर पालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरकर्त्यांकडून शुल्क आकारणी केली जात आहे. बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता या महानगरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरकर्त्यांकडून शुल्क आकारणी केली जात आहे. या आधारावर मुंबई महानगर पालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरकर्त्यांकडून शुल्क आकारणी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.