जेएनएन, मुंबई: राज्यात 3 एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस, वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविले आहे. दरम्यान काल राज्यात अवकाळी पाऊस पडला आहे. वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस राज्यातील अनेक भागात पडला आहे.
पुढील दोन दिवस पावसाची शक्यता
विदर्भ, मराठवाडासह अनेक भागात अवकाळी पाऊस पडला असून तोंडांवर आलेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश भागात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, गहू, ज्वारी, टरबूजासह अनेक उन्हाळी पिकाचे नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस सुद्धा अवकाळी पाऊस अनेक भागात पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शविला आहे.
गारपिटीचा अलर्ट
राज्यातील अनेक भागात गारपीटचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागात जोरदार पाऊस आणि तुफान वादळाचा तडाखा बसणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील वातावरणात बदल सुद्धा होत आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.
पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती
विदर्भ, मराठवाडा, खानदेश भागात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने, शेतकरीची मोठी धावपळ झाली आहे. अवकाळी पावसाने ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वातावरणीय बदलचा प्रभाव
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत देशाच्या अनेक भागात हवामानात मोठा बदल होणार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दक्षिण भारत, पश्चिम आणि मध्य भारतात हवामानात मोठा बदल होणार आहे. तर, काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट पहायला मिळणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.