जेएनएन, मुंबई: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घालत आहे. यातच कोणीतरी खोडसाळ पणा करुन छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल इंटरनेट विकिपीडियावर आक्षेपार्ह लिखाण केले आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींकडून हा मजकूर हटविण्याची मागणी केली जात आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध लिहिलेल्या विधानांचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही आमच्या सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती कारवाई करण्याचे आणि अशा चुकीची माहिती त्वरित काढून टाकण्यासाठी प्लॅटफॉर्मचे व्यवस्थापन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले आहेत..."
मुंबई, महाराष्ट्र: सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा, "हम विकिपीडिया पर छत्रपति संभाजी महाराज के खिलाफ लिखे गए बयानों की कड़ी निंदा करते हैं। हमने अपने साइबर विभाग के अधिकारियों को आवश्यक कार्रवाई करने और प्लेटफ़ॉर्म का प्रबंधन करने वाले संबंधित अधिकारियों से संवाद करने का निर्देश दिया… pic.twitter.com/HfNlWUK1id
— IANS Hindi (@IANSKhabar) February 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांनी राज्य सायबर पोलिसांना विकिपीडियाशी संपर्क साधण्याचे आणि विकिपीडियावरील छत्रपती संभाजी महाराजांबद्दल 'आक्षेपार्ह' मजकूर काढून टाकण्याची विनंती करण्याचे निर्देश दिले आहेत.
विकिपीडियासारख्या मुक्त-स्रोत प्लॅटफॉर्मवर इतिहासाचे विकृतीकरण सहन केले जाणार नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. राज्यातील काही संघटना चुकीची माहिती देत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पत्रकारांना सांगितले.
हेही वाचा - Shiv Jayanti 2025: बदलापुरात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
तथापि, मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की विकिपीडिया भारतातून चालत नाही आणि संपादकीय अधिकार असलेल्या स्वयंसेवकांद्वारे त्याचे व्यवस्थापन केले जाते. "आम्ही त्यांना काही नियम लागू करण्यास सांगू शकतो जे तथ्यांचे असे विकृतीकरण थांबवतील," असे फडणवीस म्हणाले.