जेएनएन, मुंबई. shivaji maharaj jayanti 2025: हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे बदलापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण (Shivaji Maharaj statue in Badlapur) करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असलेल्या बदलापुरात आता शिवरायांचा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. बुधवारी हा पुतळा शहरात आणण्यात आला आहे. बदलापूर शहराच्या पूर्व भागातून निघालेल्या भव्य मिरवणुकीत नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. साहसी खेळ, पारंपरिक वेशातील मुले मुली, ढोलताशा पथक अशी ही भव्य मिरवणूक शहराच्या पूर्व भागातून उल्हास नदीपर्यंत नेण्यात आली होती.
निश्चयाचा महामेरु,
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 18, 2025
बहुत जनांसी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु
।। श्रीमंतयोगी।।
🚩 Unveiling of 'Ashwarudh Statue of Chhatrapati Shivaji Maharaj' at the hands of CM Devendra Fadnavis
🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्या'चे… pic.twitter.com/yEsvjv46D9
बदलापुरात शिवरायांचे मंदिर
स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी जातीय सलोख्यासाठी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरु केला होता. याल बदलापुरातून (Badlapur) उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. बदलापूर 1920 पासून शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिरही याच बदलापुरात आहे. एकेकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही येथील शिवजयंतीसाठी हजेरी लावली होती, असा इतिहास आहे. बदलापूर शहराला छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट दिल्याचा दावा अनेकदा केला जातो.
यामुळे अनावरणाला उशीर
त्यामुळे बदलापूर शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे आग्रही होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी या पुतळ्यासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र पुतळा बनवण्यासाठीचा वेळ मोठा असल्याने विधानसभेनंतर पुतळ्याचे काम पूर्ण झाले. सोमवारी हा पुतळा पुणे येथील कार्यशाळेतून बदलापुरकडे निघाला होता. तो बुधवारी बदलापुरात आणण्यात आला. आज या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर आज या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.