जेएनएन, मुंबई. Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची तब्येत बिघडली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अजित पवार यांचा आज पुण्यात कार्यक्रम होता. तो रद्द करण्यात आला आहे.
अजित पवार यांची प्रकृती खालावली
अजित पवार यांची प्रकृती खालावली (Ajit Pawar health deteriorated) आहे. मात्र, त्यांना नेमकं काय झालं आहे. याची माहिती अद्याप समोर आली नाही आहे.
अजित पवार यांनी (ajit pawar) तब्येतीच्या कारणास्तव पुण्याच्या औंध येथील ITI मधील प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आयोजित कार्यक्रमालाही जाणं टाळलं. तब्येत बिघडल्याने त्यांनी सोमवारचे (दि. 17 फेब्रुवारी) सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत.
अजित पवार यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना लोकांना गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या अलिकडच्या घटनांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून कमी शिजवलेले चिकन खाणे टाळण्याचे आवाहन केले होते.