जेएनएन, मुंबई. Mumbai Minor Rape Case: मुंबईच्या कुर्ला परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 5 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुन्हा दाखल

याप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पीडितेवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. ही घटना चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

हेही वाचा - राज्यात नवी राजकीय खळबळ, फडणवीसांना का भेटत आहेत उद्धव ठाकरेंचे नेते? शरद पवार करत आहेत शिंदेंची स्तुती

आईच्या पायाखालची जमीनच सरकली

पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही आरोपी मुलांनी अल्पवयीन मुलीला कुर्ला येथील एका ठिकाणी नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप (Kurla Minor Rape Case) आहे. वेदनेने तडफडणाऱ्या मुलीने तिच्या आईला तिच्यासोबत झालेली आपबिती सांगितली. त्यावेळी आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या आईने पीडितेला तातडीने मुंबईतील रुग्णालयात दाखल केले, सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

    अल्पवयीन मुलांना अटक

    चुनाभट्टी पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध बीएनएस कायद्याच्या संबंधित कलमांखाली, कलम 64 आणि 65 (2), तसेच मुलांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर, पोलिसांनी दोन्ही आरोपी अल्पवयीन मुलांना अटक केली आणि त्यांना बालसुधारगृहात पाठवले आहे.

    चुनाभट्टी पोलिस पुढील तपास तपास करत आहेत.