जेएनएन, मुंबई. CM Devendra Fadnavis on Nagpur Violence: नागपूर हिंसाचारावर आज विधानसभेत आमदार रोहित पवार आणि नाना पटोले यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलं. त्यावेळी बोलताना ‘नागपूर हिंसाचार हा पूर्व नियोजीत होता की नाही याबाबत असून आम्ही चौकशी करत आहेत. पोलिसांवर केलेला हल्ला हा क्षम्म नाही, त्यांना क्षमा नाहीच, कबरीतून खोदून काढू’ असं देवेंद्र फडणवीसांनी सभागृहाला आश्वस्त केलं आहे.
आता नागपूर शांत आहे. नागपूर हे शांततेसाठी प्रसिद्ध आहे. 1992 नंतर इथं कधीही दंगल झालेली नाही. सोमवारी रात्री झालेली घटना ही काही लोकांनी जाणिव पूर्वक केल्याचं वाटत आहे. नागपुरात आंदोलनात आयाती जाळल्या अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या. त्यामुळे पुढील हिंसाचार झाला. काही लोक सामाजिक स्वास्थ बिघडवतात. पोलिसांनी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे, असं फडणवीस म्हणाले.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या काही घटना घडला आहेत. राज्य सरकारसमोर अनेक आव्हान आहेत. तरीही या आव्हानांना तोंड देऊन त्यातून योग्य मार्ग सरकार काढत आहे. राज्यात चांगली कायदा व व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे, असं फडणवीस म्हणाले.