जेएनएन, मुंबई. Mumbai Rains Latest News: मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण अंशतः ढगाळ राहील. काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती बीएमसीने दिली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई शहरात दिवसभर ढगाळ वातावरण असून मध्यम ते हलक्या स्वरुपात तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली जात आहे.
या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट
राज्यातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
🗓️ ३० मे २०२५
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 30, 2025
⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण अंशतः ढगाळ राहील. काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊भरती -
दुपारी ०२:४२ वाजता - ४.६४ मीटर
ओहोटी-
रात्री ०८:५१ वाजता - १.६४ मीटर
🌊भरती -
मध्यरात्रीनंतर- २:२१ वाजता - ३.८६ मीटर…
अरबी समुद्राला आज मुंबईच्या किनारपट्टीवर भरती ही दुपारी 02:42 वाजता 4.64 मीटरची येणार आहे. तर ओहोटी रात्री 08:51 वाजता - 1.64 मीटरची येणार आहे. तर पुन्हा भरती मध्यरात्रीनंतर 2:21 वाजता 3.86 मीटर (उद्या 31.05.2025) तर ओहोटी सकाळी 08:20 वाजता - 0.79 मीटर (उद्या 31.05.2025) येणार आहे, अशी माहिती ही बीएमसीनं दिली आहे.