जेएनएन, मुंबई. Mumbai Coastal Road Acident: मुंबईच्या कोस्टल रोडवर एक भीषण अपघात झाला. एका स्विफ्ट कारचे नियंत्रण सुटले आणि ती अनेक वेळा उलटली, बांद्रा मरीन ड्राईव्ह लाईन मार्गिकेवर हा अपघात झाला आहे, अशी माहिती आहे.

ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल 

कोस्टल रोडवर झालेल्या या अपघातात (Coastal road accident) कारमधील दोन्ही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कार चक्काचूर

    सुसाट कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार उलटली आणि कारने अनेक वेळा पलट्या मारल्या. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. तर शेवटी सुसाट कार ही रोडवरील दुभाजकाला धडकली. कारमध्ये त्यावेळी दोघे होते. कारची कशाप्रकारे दुर्दशा झाली आहे. हे व्हिडिओतून दिसत आहे. यावरुन आपण हा अपघात किती भयंकर असेल याचा अंदाज लावू शकता.

    हेही वाचा - Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा ‘दारु’ण पराभव, एकनाथ शिंदेंनी सोडलं टीकास्त्र 

    काही काळ बघ्यांची गर्दी जमल्यामुळे घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सर्व वाहतूक नियंत्रित केली. (Mumbai Accident)