जेएनएन, नवी दिल्ली. दिल्ली विधानसभा निडणुकीत आपचा मोठा पराभव झाला आहे. तर भाजपाला मोठं यश मिळालं आहे. या यशानंतर एनडीए मधील नेते हे आपवर टीका करत आहेत. तर भाजपाला शुभेच्छा देत आहेत.

 शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपवर टीकास्त्र डागले आहे. त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये 'आपदा' टळली असं म्हणतं आप वर टीका केली आहे.

'आपदा' टळली

यह मोदीजी की गॅरंटी का कमाल है | महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! दिल्लीकरांवरचे गेली 10 वर्षे असलेलं 'आप'चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही 'आपदा' टळली. त्याचबरोबर, संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केलं आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद! असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

    देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही

    घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

    हेही वाचा - LIVE Delhi Assembly Election Result 2025: धक्कादायक; केजरीवाल आणि सिसोदिया पराभूत तर अतिशी विजयी!