जेएनएन, मुंबई. Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांना अपात्र झाल्याची माहिती माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट द्वारे दिली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार या पाच लाख लाडक्या बहिणीकडून दिलेले पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे, असं बोललं जात आहे. मात्र, यावर आता अदिती तटकरे यांनी अधिकृत ट्वीट करुन मोठी अपडेट दिली आहे.

मंत्री म्हणतात…

महायुती सरकारमधील काही मंत्रीने सुद्धा अपात्र बहिणींचे पैसे परत घेण्यासंदर्भातील चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणीचे नावं कमी करण्यात आले आहे असे सांगितले आहे. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अपात्र बहिणी स्वतः पैसे परत करायला तयार असल्याचे सांगितले आहे. 

काय आहे अदिती तटकरे यांचा ट्वीट! 

28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :

  • संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - 2,30,000
  • वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला - 1,10,000
  • कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला -1,60,000
  • एकुण अपात्र महिला - 5,00,000

महाराष्ट्र शासन कटिबध्द 

    सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर पैसे परत घेणार असल्याने लाडक्या बहीणीत भीतीचे वातावरण आहे. अनेक लाडक्या बहीणींला सरसकट लाभ मिळाल्याने एक मोठी रक्कम सरकारला परत करावी लागणार असल्याने सद्या काही लाडक्या बहिणी चिंतेत आहे.

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही ! 

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै 2024 ते डिसेंबर 2024) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. असं अदिती तटकरे यांनी ट्वीट करुन सांगितले आहे. (Mukhyamantri Ladki bahin Yojana Update)

    हेही वाचा -New Delhi Assembly Election Result 2025: अरविंद केजरीवालांनी घेतली आघाडी, भाजपा उमेदवार पिछाडीवर, वाचा सविस्तर