जेएनएन, मुंबई. Maharashtra Political News: "शिवसेना युबीटीने वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करून आपला खरा चेहरा दाखवून दिला आहे. त्यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीला पूर्णपणे सोडून दिले आहे. हे दुर्दैवी आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. 

उद्धव ठाकरे हे असदुद्दीन ओवैसींची बोली बोलत आहेत

 त्यांनी काल सर्वात मोठा गुन्हा केला आहे. त्यांचे समर्थक आणि सहयोगी लाजिरवाणे आहेत. हे दुरुस्ती विधेयक वक्फ मालमत्तेवरील मूठभर लोकांची मक्तेदारी रद्द करेल. काँग्रेसला गरिबांना गरीबच ठेवायचे आहे. उद्धव ठाकरे हे असदुद्दीन ओवैसींची बोली बोलत आहेत. जे त्यांनी सांगितलं तेच हे सांगत आहेत, असंही शिंदे म्हणाले.

UT म्हणजेच Use And Throw 

    दरम्यान, पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला एनएससी असं म्हणत टीका केली आहे, यावर काय सांगाल, असा प्रश्न केला असता ‘त्यांच्या टीकेला उत्तर आम्ही टीकेतून देणार नाहीत, आम्ही कामातून त्यांना उत्तर देऊ असं शिंदे म्हणाले. यानंतर, त्यांनी मला एसएनसी म्हटलं आहे, तर मी त्यांना UT म्हणजेच Use And Throw वापरा आणि फेकून द्या असं त्यांचं काम आहे, त्यामुळे लोक सोडून जात आहेत. याच आत्मचिंतन करा.’ अशी टीका शिंदे यांनी केली.

    हेही वाचा - Waqf Amendment Bill: देशात वक्फ बोर्डाची किती आहे मालमत्ता? आकडा ऐकून थक्क व्हाल

    बाळासाहेबांनी नेहमीच देशभक्त आणि राष्ट्रभक्त मुसलमानांना पाठिंबा दिला आणि देशविरोधी मुस्लिमांना कायम विरोध केला. हीच भूमिका भारतीय जनता पार्टीने देखील घेतली, मात्र राहुल गांधींच्या सावलीत राहिल्याने उबाठाला वारंवार जिनांची आठवण येत आहे, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आज त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे स्वत:ची अब्रू काढण्याचा प्रकार आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकामुळे मुठभर लोकांना वक्फ मालमत्तांची लूट करण्यापासून चाप बसेल आणि गरिब मुस्लिमांना त्याचा फायदा होईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.