जेएनएन, मुंबई Uddhav Thackeray Mumbai Press on Waqf Amendment Bill: वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झाले. वक्फ बोर्डाच्या विधेयकवर भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मित्र पक्षांनी मुस्लिम समाजाच्या विकासाच्या बाजूने बोलत होते. त्यामुळे पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिना सुद्धा लाजले असतील, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुस्लिमच्या बाजूने काल कोण बोलले हे सर्वांना माहीत आहे. मग हिंदुत्व कोणी सोडलं, आम्ही की भाजपने असा सवाल ही उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही कधीही हिंदुत्व सोडलं नाही, भाजप फक्त हिंदुत्वाच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचा काम करते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

वक्फ बोर्डाच्या जागेवर भाजपची नजर

वक्फ बोर्डाच्या जागेवर भाजपची नजर आहे, त्यामुळे नवीन विधेयक आणून मंजूर केले आहे. भाजपला फक्त जागा पाहिजे आहेत. त्यांना इतर कोणत्याही गोष्टीत रुची नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

किरेन रिजीजू यांनी वक्फ संशोधन विधेयक मांडले, त्याच रिजीजू यांनी गौमासचं समर्थन केलं आहे. मग खरा हिंदुत्व कोणाचा असा थेट सवाल ही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. हिंदुत्व सोडणाऱ्याने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशी टीका ही उद्धव ठाकरे यांनी केली.

    मुद्दे भटकविण्यासाठी असे विधेयक 

    केंद्रात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे आणि परिस्थिती चांगली चालली आहे, तरीही ते हिंदू-मुस्लिम मुद्दे उपस्थित करत आहेत. भाजप मुद्दे भटकविण्यासाठी असे विधेयक आणतात. चीन भारतात घुसखोरी करत आहे, भारतीय अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे, रोजगार नाही, कश्मीरचा मुद्दे आहेतच, असे अनेक मुद्दे आहेत त्याला सोडविण्याची गरज आहे. परंतु भाजप मात्र दुसरे विषय घेऊन मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचे काम करत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

    मोदी यांनी अमेरिकेच्या आयात शुल्काच्या धोक्याबद्दल...

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या आयात शुल्काच्या धोक्याबद्दल आणि ते कमी करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांबद्दल देशाला सांगायला हवे होते, असंही ठाकरे म्हणाले.