जेएनएन, मुंबई: वक्फ दुरुस्ती विधेयक काल लोकसभेत मंजूर (Waqf Amendment Bill) झाले. वक्फ बोर्डाचा मालमत्ता किती आहे, यांचा आकडा ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. देशात वक्फ बोर्डाची 8,65,644 स्थावर मालमत्ता आणि 9.4 लाख एकर वक्फ जमिन आहे.

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक पारित 

देशात, रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर, सर्वात जास्त जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाने डिसेंबर 2022 मध्ये लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली आहे. काल लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक पारित करण्यात आले आहे.

दिल्लीसारखे तीन शहरे बांधता येतील

अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, वक्फ बोर्डाकडे 8,65,644 स्थावर मालमत्ता आहेत. अंदाजे 9.4 लाख एकर वक्फ जमिनीची अंदाजे किंमत 1.2 लाख कोटी रुपये आहे. एक गैर-सरकारी संस्था म्हणून, वक्फकडे देशात सर्वात जास्त जागा आहे. वक्फ बोर्डाकडे असलेल्या जमिनीवर दिल्लीसारखे तीन शहरे बांधता येतील एवढी जागा उपलब्ध आहे.

    या राज्यात आहेत वक्फची जागा!

    भारतातील प्रत्येक राज्यात एक वक्फ बोर्ड आहेत. जे वक्फ मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. देशातील पाच राज्यांमध्ये वक्फकडे सर्वाधिक मालमत्ता आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल राज्याचा समावेश आहे. 

    हैदराबादमध्ये वक्फकडे 77,000 मालमत्ता आहेत. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात वक्फच्या 1.2 लाख मालमत्ता आहेत. तेलंगणाचे वक्फ बोर्ड हे देशातील सर्वात श्रीमंत वक्फ बोर्ड आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशात 1.5 लाख वक्फ मालमत्ता आहे. कर्नाटकातील बेंगळुरू, गुलबर्गा, बिदर येथे 30 हजार हून अधिक वक्फ मालमत्ता आहेत. हैदराबाद (तेलंगणा), दिल्ली, अजमेर (राजस्थान), मुंबई (महाराष्ट्र) या शहरात सर्वात जास्त मालमत्ता आहेत.