जेएनएन, मुंबई. Maharashtra Political News: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली आहे. यानंतर काँग्रेस पक्षातील 16 पैकी 10 आमदार महायुतीसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या नेतृत्वात ऑपरेशन टायगर होणार असून आमदार महायुती जाणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra Politics News)

पक्ष मजबूत करण्यास मोठी अडचण

हर्षवर्धन सपकाळ यांच्या पदग्रहण समारोह झाल्यानंतर पक्षातील आमदार सांभाळून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. हर्षवर्धन सपकाळ हे कार्यकर्त्यांच्या जास्त ओळखीचे नेते नसल्याने पक्ष मजबूत करण्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते, अशी माहिती काही आमदारांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिली आहे.

10 आमदाराचा ऑपरेशन टायगर!

हर्षवर्धन सपकाळ हे जरी पक्षातील नेते असले, तरी  मात्र पक्षाला उभारी देण्यासाठी मजबूत नेतृत्वालाच पक्षाची जबाबदारी द्यायला हवी होती, असे पक्षाचे कार्यकर्ते आपआपसात चर्चा करत आहेत. 10 आमदाराचा ऑपरेशन टायगर (Operation Tiger in Maharashtra) झाल्यास पक्षाला मोठी अडचण आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. (Mumbai Politics)

    हर्षवर्धन सपळाक यांच्याबद्दल थोडक्यात माहिती

    युवावस्थेपासूनच गाडगे महाराज, तुकडोजी महाराज व गांधीवादी - सर्वोदयी कार्यकर्ता अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख आहे. आता त्यांची काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नवा प्राण फुंकण्याचे आव्हान त्यांच्या पुढे आहे. येत्या काळात महाराष्ट्राता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्यातच आता काँग्रेस आमदार पक्षाला सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेसला उभारी देण्यासह त्यांच्यावर पक्ष संघटना बांधून ठेवण्याचे मोठ्या जिकीरीचे काम आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.