जेएनएन, मुंबई. NDRF teams in Maharashtra: राज्यात आपत्ती परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके सतर्क आहेत. मुंबई शहर व उपनगरमध्ये एनडीआरएफची तीन पथके, पालघरमध्ये एक, नागपूर येथे दोन पथके तैनात आहेत. तर पुणे मुख्यालय येथे एनडीआरएफची दोन पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. नागपूर व धुळे येथे एसडीआरएफची प्रत्येकी दोन पथके तैनात असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील 24 तासांमध्ये (29 मे रोजी सकाळपर्यंत ) मुंबई उपनगरात सर्वाधिक 35.2 मिमी पाऊस झाला आहे. मुंबई 29.8 मिमी, ठाणे 29.5 मिमी, नाशिक 26.3 मिमी आणि रायगड जिल्ह्यात 21.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आज मागील २४ तासांत झालेला पाऊस 

राज्यात कालपासून आज 29 मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे जिल्ह्यात 29.5, रायगड 21.9, रत्नागिरी 10.1,  सिंधुदुर्ग 13, पालघर 3.1, नाशिक 26.3, धुळे 15.9,  नंदुरबार 5.2, जळगाव 3.2, अहिल्यानगर 4.3,  पुणे 4.8, सोलापूर 5.7,  सातारा 3.9,  सांगली 1.6,  कोल्हापूर 0.7, छत्रपती संभाजीनगर 2.8,  बीड 1, लातूर 2.1,  धाराशिव 9.7, परभणी 0.1, हिंगोली 0.1, यवतमाळ 0.1, वर्धा 4.7, नागपूर 20.8, भंडारा 1.7, गोंदिया 5 आणि गडचिरोली 0.9.

राज्यात काल झालेली हानी

    काल मुंबई शहरमध्ये झाड पडून दोन व्यक्ती, पालघर जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती आणि सातारा जिल्ह्यात बंधाऱ्यात पडून एक व्यक्ती मृत झाली आहे. मुंबई उपनगर येते झाड पडून दोन, पुणे जिल्ह्यात आगीच्या घटनेत चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात 26 प्राणी, वर्धा जिल्ह्यात एक आणि चंद्रपूर जिल्ह्यात एक प्राणी मृत झाला आहे. तसेच मुंबई काळाचौकी येथे भारत आइस कंपनीमधून होणारी अमोनिया वायुची गळती मुंबई महानगरपालिका आणि अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करुन वायू गळती थांबवली असल्याचे सांगण्यात आले आहे.