जेएनएन, मुंबई. Maharashtra Budget Session 2025: सौरघर योजना महाराष्ट्रात सुरु आहे. यातून 70 टक्के ग्राहक म्हणजेच जवळपास दीड कोटी ग्राहक पूर्णपणे वीजबिल मुक्त होतील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. (Devendra Fadnavis on Light Bill) ते राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते.
आपण मोठ्या प्रमाणात ग्रीन उर्जेचा वापर करणार
महाराष्ट्रात 2030 पर्यंत आपण अपारंपारिक उर्जा स्रोतातून निर्मित होईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न पुर्णत्वाकडे जाताना आपल्याला दिसेल, असं फडणवीसा यांनी सांगितलं. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर त्यासाठी वीज महत्त्वाची आहे. यासाठी आपण मोठ्या प्रमाणात ग्रीन उर्जेचा वापर करणार आहोत. असं फडणवीसांनी सांगितलं.
सूर्य घर योजनेत महाराष्ट्र देशात पहिल्या नंबरवर
मागेल त्याला सौरकृषी पंप योजना आपण सुरू आहे. 8 वर्षात राज्यात 1 लाख 84 हजार पंप बसवण्यात आले असून मागील 1 वर्षात पावणे तीन लाख पंप बसवले गेले आहेत. 2 लाख 75 हजार कृषी पंपामुळे 14 लाख एकर जमीन सिंचनाखाली आली आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेत आपण देशात पहिल्या नंबरवर आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.
दीड कोटी ग्राहक पूर्णपणे वीजबिल मुक्त होणार
1 लाख 30 हजार घरगुती ग्राहकांना 1 हजार कोटीपेक्षा जास्त अनुदान देऊन रूफ सोलार योजनेचा लाभ दिलेला आहे. केंद्र शासनाच्या या योजनेच्या धर्तीवर राज्य नवीन योजना तयार करत आहे. आपल्याकडील घरगुती ग्राहकांच्या 70 टक्के ग्राहक हे शून्य ते शंभर युनिट वीज वापरतात, त्यांच्यासाठी राज्याची योजना आम्ही करतोय. यामुळे हे 70 टक्के ग्राहक योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील. 70 टक्के ग्राहक म्हणजेच जवळपास दीड कोटी ग्राहक पूर्णपणे वीजबिल मुक्त होतील असं त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या धर्तीवर लवकरच राज्यात योजना
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या धर्तीवर लवकरच राज्यात योजना तयार केली जात आहे. त्यातून दीड कोटी ग्राहक वीजबिल मुक्त होतील. 70 टक्के वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केला.