जेएनएन, मुंबई. World Women's Day 2025: महिला दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) सर्व लाभार्थ्यांना दोन महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यांचा मिळून एकूण 3000 रुपये सन्मान निधी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. 

महिला दिनाचे औचित्य साधून (World Women Day 2025)

सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवशेन सुरु आहे. या अधिवेशनात भाग घेण्यास मंत्री अदिती तटकरे ह्या आल्या होत्या. यावेळी त्यांनी महिला दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दोन महिन्याचा निधी वितरीत करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे महिलांना आता 3000 रुपये एकदाच मिळणार आहेत. 

लाडक्या बहिणींना खुशखबर

8 मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलासाठी सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येत असते. याच दिनाचे औचित्य साधत देवेंद्र फडणवीस सरकारनं लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे. 

    आजपासून निधी वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु 

    2 कोटी 52 लाख महिलांना आजपासून निधी वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. लवकरच सर्व महिल्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

    महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही

    विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर तटकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, विरोधकांकडून नेहमीच या योजनेवर टीका झाली आहे. मात्र, एकही महिना असा नाही की त्या महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. आम्ही आमचे काम यशस्वीरित्या करत आहोत. विरोधक टीका करतच असतात, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.