जेएनएन, मुंबई. Maharashtra Budget Session 2025 Devendra Fadnavis Speech: राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत चालू आहे. या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधकांंमध्ये खडाजंगी आणि कलगीतुरा सुरु असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नाची उत्तरे देखील दिली. यावेळी मात्र, सभागृहात खेळीमेळीचं वातावरण दिसून आहे. देवेंद फडणवीसांची भाषणात काही डायलाग मारले तसंच गझल म्हणत नाना पटोले, जयंत पाटील अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

‘जयंतराव तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता’

“जयंतराव तुमचा प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर बाजूला बसलेल्या अजित पवारांनी लागलीच “माझ्यासारखं करत नाहीत ते”, असं म्हणताच सभागृहात मोठा हशा पिकला.

गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये

‘जयंतरावंसारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये. रोहित दादा वगैरे ठीक आहेत.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे 

    असतात शंकेखोर जे, त्यांचे कधी झाले बरे?”

    ही सुरेश भट यांची गझल फडणवीसांनी ऐकवली. यावेळी सत्ताधारी व विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्यावर दिलखुलास दाद दिली.

    हेही वाचा - Mumbai Accident News: मुंबईत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

    ‘मी उद्धव ठाकरे नाही’

    भाषणादरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. "चालू प्रकल्पांना स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय त्यांचे एकटे नव्हते. ते माझे आणि अजित पवार यांचेही होते," असे देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले. तसंच, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकार समन्वयाने काम करते आणि सर्व आघाडीचे नेते निर्णय घेण्यामध्ये सहभागी असतात, असं त्यांनी सांगितलं.

    नानाभाऊ आमच्या विदर्भाचा बुलंद आवाज 

    नानाभाऊं चर्चेत सहभाग घेतला नाही की काँग्रेसनेसुद्धा नानाभाऊंचे नाव कापले? नानाभाऊ आमच्या विदर्भाचा बुलंद आवाज आहे. तो दाबण्याचा कोणी प्रयत्न करत असले तर ते बरोबर नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. गेल्या चार दिवसांपासून ते रंगीबेरंगी कपडे घालून येत होते. त्यामुळे ते सध्या वेगळ्या मुडमध्ये आहेत का? असे वाटत होते. आज ते पुन्हा एकदा पांढऱ्या कपड्यात आल्याचे देखील फडणवीसांनी म्हटले.