जेएनएन, नाशिक. Apmc Lasalgaon Onion Price: लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती शिवाजी महाराज कांदा व मुख्य बाजार आवारा वरील धान्य भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव 6 दिवस बंद राहणार आहेत.  कांदा व धान्य भुसार व तेलबिया या शेतीमालाचे 28 मार्च पासून 1 एप्रीलपर्यंत बंद राहतील. याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी, असं आवाहन लासलगाव बाजार समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

गुरुवारी 100 रुपयांनी भाव पडले

लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी 13022 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत 1325 रुपये भाव मिळाला आहे. 

लाल कांद्याला किमान 700 रुपये तर कमाल 1463 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण लाल कांद्याची खरेदी 1350 रुपये भावाने झाली आहे. तसंच, उन्हाळ कांद्याला भाव हा किमान 900 रुपये तर कमाल 1786 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण लाल कांद्याची खरेदी 1551 रुपये भावाने झाली आहे.  

    बाजारभाव - रुपये प्रति क्विंटल

    लासलगाव बाजारसमितीच्या माहिती नुसार (गुरुवारचे भाव)

    धान्य आवक - रुपये प्रति क्विंटल

    वस्तूकिमानकमालसर्वसाधारण
    लाल कांदा70013911325
    उन्हाळ कांदा80016901500
    लासलगाव बाजारसमितीच्या माहिती नुसार (गुरुवारचे भाव)

    या दिवशी बंद असेल बाजार समिती

    • शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी व्यापारी वर्गास बाहेरगावी जायचे असल्याने व
    • शनिवार दिनांक 29 मार्च रोजी शनि अमावस्या तसेच 30 रोजी रविवार असल्याने
    • सोमवार दिनांक 31 मार्च रोजी रमजान  ईद असल्याने व 
    • मंगळवार दिनांक 01 एप्रिल रोजी बँक व्यवहार बंद असल्याने

    हेही वाचा - Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब' - नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले... पाहा Video

     2 एप्रिल पासून व्यवसार सुरु 

    कांदा व धान्य भुसार व तेलबिया या शेतीमालाचे दिनांक 28 मार्च पासून 1 एप्रिल पर्यंत बंद राहतील. याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी. बुधवार दिनांक 02 एप्रिल पासून कांदा व धान्य भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव सुरू होतील.

    वस्तूकिमानकमालसर्वसाधारण
    सोयाबीन360041264032
    गहू245131302676
    बाजरी252231312981
    ज्वारी210034002701
    मूग300063004500
    हरभरा (लोकल)430154005240
    हरभरा (कांटा)380155005380
    मका209522762240
    तूर280067016401
    उडीद250168015001