जेएनएन, मुंबई. Maharashtra Latest News: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे ‘राज्य ग्राहक हेल्पलाईन‘ हे 31 मार्च 2025 रोजी मध्यान्हानंतर बरखास्त करून ‘राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन’ मध्ये विलीन करण्यात येत आहे. 1 एप्रिल 2025 राज्यातील सर्व ग्राहकांनी आपल्या समस्या व तक्रारी ‘राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन’कडे मांडावेत, अशी माहिती सूचना कक्ष अधिकारी ईशा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

राज्याची हेल्पलाईन राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनमध्ये विलीन

राज्यात “कंझ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई” या संस्थेच्या मदतीने “राज्य ग्राहक हेल्पलाईन” ची  21 ऑक्टोबर 2010 च्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आली होती. उपभोक्ता मामले विभाग, भारत सरकार यांच्या सुचनेनुसार, 26 मार्च 2025 रोजीच्या शासननिर्णय क्र. संकिर्ण-2025/प्र.क्र10/ग्रासं-2 अन्वये “राज्य ग्राहक हेल्पलाईन” ही 31 मार्च 2025 मध्यान्हानंतर पासून बरखास्त करुन “राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन” मध्ये विलिन करण्यात आली आहे. तरी, राज्यातील सर्व ग्राहकांस विनंती आहे की, 1 एप्रिल, 2025 पासून सर्व ग्राहकांनी आपल्या समस्या व तक्रारी “राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन” कडे करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

येथे नोंदवता येईल तक्रार

याकरीता पुढील माध्यमांचा वापर करावा.  ई-मेल आय डी: nch-ca@gov.in, टोल फ्री क्रमांकः 1800114000 किंवा 1915 (सार्वजनिक सुट्टया सोडुन इतर सर्व दिवशी -सकाळी 08:00 ते रात्री 08:00), https://consumerhelpline.gov.in/user/signup.php या वेब पोर्टलद्वारे, एसएमएस तसेच व्हाट्सअपद्वारे 8800001915 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच NCH APP द्वारे, ग्राहक UMANG APP द्वारे आपल्या तक्रारींची नोंद करु शकतात, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.