जेएनएन, मुंबई. Naresh Mhaske statement on Uddhav Thackeray: मागील काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरुन वादंग सुरु होते. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे खासदास नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘उद्धव ठाकरे हे नवीन युगाचे 'आधुनिक औरंगजेब' आहेत.’ असं नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 

ते नवीन युगाचे 'आधुनिक औरंगजेब'

शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना, शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणतात, "ते नवीन युगाचे 'आधुनिक औरंगजेब' आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावांना औरंगजेबासारखेच त्रास दिला. राज ठाकरेंनी स्वतः म्हटले होते की, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या शेवटच्या काळात त्रास दिला... ते त्यांच्या वडिलांच्या विचारसरणीचे पालन करत नव्हते. म्हणूनच उद्धव ठाकरे हे 'आधुनिक औरंगजेब' आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व विचारसरणीचे शत्रू असलेल्यांशी हातमिळवणी केली..."

हेही वाचा - PM Narendra Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर, स्वागताची जय्यत तयारी सुरु

औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून नागपुरात झाला होता हिंसाचार

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथं मुघल सम्राट औरंगजेबाची कबर आहे. ही कबर हटवण्याची राज्यातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी नागपुरात निदर्शने करत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली. यावेळी आयाती जाळल्या अशी अफवा समाज माध्यमांवर परसली आणि नागपुरात हिंसाचार झाल्याचं समोर आलं होत. या हिंसाचारात एका समाज गटाकडून नागपुरातील महाल भागात जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणात आतापर्यंत शंभरहून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली आहे.