जेएनएन, मुंबई. महायुती सरकारने राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना (Ladki Bahin Yojan) मोठी खुशखबर दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. (Ladki Bahin Yojana October Installment) आहे. यासाठी लागणारा 263.45 कोटी रुपयांचा निधी हा महिला आणि बाल कल्याण विभागाच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
नोव्हेंबरचा हफ्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana November Installment Date)
महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या लाडक्या बहिणींकरिता पुढील हप्त्यासाठी 263.45 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, शासनाकडून तशी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

केवायसी करण्याची शेवटची तारीख (Ladki Bahin Yojana eKYC Last Date)
मंत्री अदिती तटकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार, 31 डिसेंबरच्या पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थांना ई-केवायसी पूर्ण करायची आहे. जर केवायसी पूर्ण केली नाही, तर तुम्हाला त्यापुढील हफ्ते मिळणार आहेत, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेत राहण्यासाठी तुम्ही आपली केवायसी करुन घ्यावी.
अजित पवारांची मोठी घोषणा
राज्यात लाडकी बहीण योजनेच्या दोन कोटीपेक्षा अधिक महिला लाभार्थी आहेत. या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतर्गंत लाभार्थींना लाभ देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ देण्यासाठी अजित पवार यांनी पुरवणी मागण्यामध्ये 6,103.20 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली आहे.
सविस्तर वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थांसाठी गुडन्यूज, अजित पवारांनी अधिवेशनात केली मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana E-KYC लाडकी बहिण योजनेची ई-केवायसी कशी करायची
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
- या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
- यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
- * जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
- * जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
- जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
- यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
- त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
- 1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
- 2. माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
- वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
- शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
हेही वाचा - MPSC ची संयुक्त परीक्षा गट-ब पुढे ढकलली; आता या दिवशी होणार परीक्षा
