जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी गुडन्यूज आहे. राज्यात महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून 1500 रुपयांचा मासिक हफ्ता देण्यात येतो. या योजनेसाठी लागणाऱ्या निधीबाबत अजित पवार यांनी आज हिवाळी अधिवेशनात सभागृहात मागणी केली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी 6,103.20 कोटी रुपयांची पुरवणी मागणी

राज्यात लाडकी बहीण योजनेच्या दोन कोटीपेक्षा अधिक महिला लाभार्थी आहेत. या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतर्गंत लाभार्थींना लाभ देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ देण्यासाठी अजित पवार यांनी पुरवणी मागण्यामध्ये 6,103.20 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली आहे.

लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हफ्ता कधी येणार?

राज्यात सध्या नोव्हेंबरचा हफ्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. अजित पवारांनी आज पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून निधीची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नोव्हेंबरचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.   

लाडकी बहीण योजनेचा 2,100 रुपये हफ्ता मिळणार का?

    विधानसभा निवडणुकीत महायुतीने सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटूले तरीही राज्यातील महिलांना 2,100 रुपयांचा एकही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे या अधिवेशनात यावर तरतुद होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.