जेएनएन, मुंबई: Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या सरकारी नोकरी असताना सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात 2289 महिला सरकारी कर्मचारी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. राज्य सरकार त्या महिलांकडून पैसे वसूल करणार आहे, अशी चर्चा सुरु आहे.
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी केल्यानंतर अनेक महिला अपात्र असतानाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले होते.
2289 सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेचा घेतला लाभ
लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने पडताळणी केली आहे. त्यामध्ये 2289 सरकारी महिला योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले आहे. त्यांना या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. तसंच, राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसा लवकरच वसूल करणार आहे, अशी चर्चा सुरु आहे.
काय म्हणाल्या महिला व बाल कल्याण मंत्री
"लाभार्थ्यांची पडताळणी" ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास 2 लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे 2289 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी- फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
"लाभार्थ्यांची पडताळणी" ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास २ लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) May 30, 2025
मंत्री गिरीश महाजन म्हणाले…
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची तपासणी सुरू असताना या योजनेचा लाभ घेणाऱ्या जवळपास 2000 पेक्षा अधिक महिला ह्या सरकारी कर्मचारी निघाल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर मंत्री गिरीश महाजन म्हटले की, या संदर्भातली तपासणी सुरू आहे सरकारी कर्मचारी असतील इन्कम टॅक्स प्लेयर असतील यांची देखील यामध्ये नाव आलेली आहेत, ज्यांना गरज नाही अशा काही भगिनी असतील त्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा फायदा घेतला असेल यापुढे अशाना फायदा मिळणार नाही. त्यांना यातून बाद केले जाईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले.