जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे महाराष्ट्र सरकारने अनिवार्य केले आहे. ही E- KYC करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख ठेवण्यात आली आहे.
लाडकी बहिण योजेची e-KYC करण्याची शेवटची तारीख किती?
ttps://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन हे मंत्री आदिती तटकरे यांनी केले होते. मात्र, यात आता मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेची केवायसी ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत करता येणार आहे. आता केवायसी करण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत.
लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करावी?
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
- या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
- यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
- * जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
- * जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
- जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
- यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
- त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
- 1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
- 2. माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
- वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
- शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
हेही वाचा - Election News: मोठी बातमी! शेवटच्या क्षणी महायुती तुटली; भाजप स्वबळावर लढणार
ई-केवायसी (e-KYC) करण्याची प्रक्रिया: (How to do e-KYC Ladki Bahin Yojana)
पोर्टलवर लॉगिन:
सर्वप्रथम, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोर्टलवर तुमच्या मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
अर्ज भरा:
लॉग इन केल्यानंतर, "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिन योजनेचा अर्ज" या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
आधार आधारित पडताळणी:
त्यानंतर तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, ज्यात तुमचा आधार क्रमांक वापरून तुमची ओळख पडताळली जाईल.
नारीशक्ती ॲप वापरूनही प्रक्रिया:
काही लाभार्थ्यांनी नारीशक्ती ॲपचा वापर करून अर्ज भरले आहेत. त्यांनाही ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
