जेएनएन, मुंबई. Maharashtra Political News: राज्यातील शासकीय धान्य गोडावूनमध्ये डॅनेज पॅलेट पुरवठा बेकायदेशीर मार्गाने देण्यात आलेल्या कंत्राटीची चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. तरीही याप्रकरणात आता पर्यंत 31 कोटींची बिल काढण्यात आली आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.
भुजबळांच्या ऑफिसमध्ये फाईल धुळखात
तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केराची टोपली दाखवली होती. छगन भुजबळकडे कारवाईसाठी फाइल गेली असता कुठलाही शेरा न मारता ती फाइल तसीच ठेवली होती अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकारी यांनी दिली आहे.
31 कोटींची बिल काढल्यावर प्रशासनाला जाग
याचाच फायदा घेत आतापर्यंत 124 कोटी पैकी 31 कोटी रुपयाचे बिल काढण्यात आली आहेत. या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणाने एक उच्च अधिकारीची समिती स्थापन केली असून 24 मार्चपर्यंत अहवाल सादर करणार आहे. यामध्ये सुधाकर तेलंग रेशनिंग नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक आणि दोन उपआयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती उपसचिव राजश्री सारंग यांनी दिली आहे.
अंतिम निविदा झाली 124 कोटीमध्ये फायनल
डोनेट पॅलेट पुरवठाचा टेंडरची प्रक्रिया 148 कोटीने सुरु झाली होती. अंतिम निविदा 124 कोटीमध्ये फायनल झाली. यामुळे श्री.बालाजी अँन्ड कंपनी जनरल मटेरियल सप्लायर, गोंदिया कंपनीला शासनाने 21 जून 2024 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील शासकीय धान्य गोडावूनमध्ये डॅनेज पॅलेट पुरवठा करण्याचे कंत्राट दिले.
लोकजागृती मंचची तक्रार
श्री.बालाजी अँन्ड कंपनी जनरल मटेरियल सप्लायर, गोंदिया कंपनीला डोनेट पॅलेट कंत्राट बेकायदेशीर असल्याची तक्रार आमदार कृपाल तुमाने यांनी एकनाथ शिंदे तर नाना पटोले यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. या प्रकरणात कुठलीही चौकशी होत नसल्याने लोकजागृती मंचाचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण सचिव जयश्री भोज यांच्याकडे तक्रार केली आहे.
सविस्तर प्रकरण वाचा - Eknath Shinde यांचे ते आदेश मंत्रालयात पडले धूळखात, तक्रारीनंतर उपसचिव म्हणाल्या… वाचा सविस्तर काय आहे प्रकरण
काय म्हणाल्या अन्न व नागरी पुरवठा सचिव
अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण सचिव जयश्री भोज यांनी दिलेल्या महितीनुसार या प्रकरणात तीन अधिकारीची चौकशी समिती स्थापन केली आहे. चौकशी समितीला अहवाल सादर करण्यासाठी काही वेळेचे बंधन देखील टाकण्यात आले अशी माहिती दिली आहे.
काय म्हणाल्या उपसचिव अन्न व नागरी पुरवठा!
डॅनेज पॅलेट बेकायदेशीर पुरवठा प्रकरणात मराठी जागरणच्या प्रतिनिधीनं अन्न व नागरी पुरवठा उपसचिव राजश्री सारंग यांच्याशी संपर्क साधला आहे. सारंग यांनी या प्रकरणात आज माहिती दिली आहे. डोनेट पॅलेट प्रकरणात 124 कोटीचे कंत्राट श्री. बालाजी अँन्ड कंपनी जनरल मटेरियल याना दिले आहे. यामध्ये 124 कोटीपैकी शासनाने 31 कोटी रुपयाचे बिल अदा केले आहे. या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणाने एक उच्च अधिकारीची समिती स्थापन केली असून 24 मार्चपर्यंत अहवाल सादर करणार आहे.
काय म्हणाले पुरवठादार !
श्री.बालाजी अँन्ड कंपनी जनरल मटेरियल सप्लायरचे संचालक यांच्याशी संपर्क केला असता आम्ही सरकारला पुरवठा करत असल्याचे सर्व कागदपत्रे दिले आहे.
लोकजागृती मंचनं केला आरोप
अतिशय निकृष्ट दर्जाचे डॅनेज पॅलेट बेकायदेशीर पुरवठाची चौकशी करण्याचे आदेश मुखमंत्री आणि मंत्री यांनी देऊनही चौकशी केली नाही. अनेक शासकीय गोदामामध्ये निकृष्ट दर्जाचा माल असल्याने स्वीकारला गेला नाही. मंत्रालयीन अधिकारी आणि पुरवठादार यांच्या संगनमताने शासनाचे कोट्यवधी रुपये लाटले, असा आरोप लोकजागृती मंचनं केला आहे.