जेएनएन, बीड. Beed Sarpanch Murder Case: बीड जिल्ह्याचे मस्सनजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड जिल्हाच्या विशेष मकोका न्यायालयात 1400 पानाचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. CID कडून हे आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे.
9 डिसेंबर रोजी झाली होती हत्या
बीड जिल्ह्यातील एका पवनचक्की कंपनीकडे पैशांची मागणी करणाऱ्या काही व्यक्तींनी खंडणीच्या बोलीला विरोध केल्याच्या आरोपावरून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh) यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार करुन त्यांची निर्घृण हत्या केली होती.
हेही वाचा - BMC Elections: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी लांबणीवर, सर्वाेच्च न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलली
विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम
सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड. बाळासाहेब कोल्हे हे सहायक विशेष सरकारी वकील असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्वीट करून ही माहिती दिली. देशमुख कुटुंब व ग्रामस्थांची मागणी सरकारने मागणी मान्य केली.