जेएनएन, जालना. जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी ढोकसाळ सेंटर तालुका मंठा यांच्या संचालिका सीमा दत्तात्रय अवचर द्वारा संचालित नाफेड खरेदी केंद्रावर विरोधात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांनी गाळणी आणि हमालीच्या नावाखाली 140 रुपये प्रती क्विंटलची वसूली केली जात असल्याचा तक्रारीत आरोप केला होता.
या तक्रारीचा मागोवा घेत मराठी जागरणच्या प्रतिनिधीला सदर कंपनीकडून होत असलेली लूट थांबण्यात यश आले आहे. मराठी जागरणच्या प्रतिनिधीनं केलेल्या पुरवठ्यानंतर किसान महासंघांतर्फे जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी संदर्भात मोठा आदेश दिला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण -
जालना जिल्ह्यातील जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी ढोकसाळ सेंटर तालुका मंठा यांच्या संचालिका सीमा दत्तात्रय अवचर द्वारा संचालित नाफेड खरेदी केंद्र आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांकडून गाळणी आणि हमालीच्या नावाखाली 140 रुपये प्रती क्विंटलची वसूली केली जात आहे. असा आरोप करत वसुलीची तक्रार शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना केली.
यात त्यांनी नाफेड खरेदी केंद्राची 140 रुपयांची वसूली तत्काळ थांबवावी अशी मागणी त्यांनी केली. सोयाबीन खरेदी दरम्यान जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सहायक दिगंबर अवचर यांनी अनेक शेतकऱ्यांकडून पावती न देता फोन पे नंबरवर पैसे घेतले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली होती.
जिल्हाधिकारी काय म्हणाले होते…
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर मराठी जागरणच्या प्रतिनिधीनं जालना जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्णनाथ पांचाल यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नाफेडकडून खरेदीसाठी नियुक्त केलेले खासगी खरेदी सोयाबीन केंद्रावर शेतकरीची लूट थांबविण्याचे निर्देश दिले आहेत, तसंच, संबंधित केंद्राची चौकशी केली जाईल, असं म्हटलं होतं.
पुढील खरेदी थांबविण्यात येत आहे
मराठी जागरणच्या प्रतिनिधीनं ऐवढ्यावरच न थांबता, संबंधित गैरव्यवहाराची माहिती ही महाकिसान संघ कंपनी यांना दिली. त्यानंतर कंपनीनं याप्रकरणाची चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे. तसंच, या प्रकरणाचा सविस्तर खुलासा होईपर्यंत सदर सेंटर होल्ड वर ठेऊन त्यांची पुढील खरेदी थांबविण्यात येत आहे, असा आदेश दिला असल्याची माहिती कंपनीने मेलद्वारे दिली आहे.
म्हणाले होते पणन मंत्री…
राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनाही सदर प्रकाराची माहिती मराठी जागरणच्या प्रतिनिधीने दिली होती. यावर सोयाबीन खरेदीमध्ये शेतकरीकडून कुठेलही पैसे नाफेडकडून आकरले जात नाहीत. जर कोणत्या नाफेड खरेदी केंद्रावर असे पैसे आकारले जात असतील तर त्या संस्थेचा परवाना रद्द करून ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल. जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनीची चौकशी करून कारवाई केली जाईल, असं त्यांनी म्हटलं होतं.