जेएनएन, मुंबई. Swargate Bus Crime News: स्वारगेट बसस्थानकावरील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आज महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली होती. याबैठकीत महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात ठोस निर्णय होण्यात आला आहे. 

प्रत्येक बसमध्ये 

राज्य महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आले आहे. AI च्या माध्यमातून सर्व बसवर नियंत्रण करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

IPS अधिकारीची नियुक्ती करण्याची मागणी करणार

बस स्थानकवर सुरक्षा बाबत एका IPS अधिकारीची नियुक्ती करावी, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहे. या आदी महामंडळमध्ये IPS नियुक्ती प्रथा आहे ती पूर्ण व्हावी अशी आमची मागणी आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

    परिवहन मंत्र्यांचे निर्देश

    दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख (सहाय्यक वाहतूक अधिक्षक) व  आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे, असे निर्देश उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनराव यांना दिले आहेत.

    लवकरच आरोपीला अटक करू

    पोलीस या प्रकरणावर सक्रियपणे काम करत आहेत आणि बलात्कार प्रकरणाबाबत आमच्याकडे काही महत्त्वाचे धागेदोरे आहेत. आम्ही लवकरच आरोपीला अटक करू. आरोपीचा कोणताही राजकीय संबंध नाही, परंतु आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगिलतं आहे.

    आरोपीला फाशीची देण्याची सरकारची भूमिका

    पुण्यातील बस बलात्कार प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "आरोपी कोणीही असो, त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि सरकारची त्याला फाशीची देण्याची भूमिका आहे." असं एकनाथ शिंदे म्हणाले.