जेएनएन, मुंबई. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर निवडणुक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक जाहीर करु शकते. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या त्यांनी बदल्या केल्या असल्याची माहिती आहे.
- आंचल गोयल (IAS:RR:2014) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर यांची मुंबई शहर, मुंबई येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- अंकित (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- मीनल करनवाल (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हा परिषद, जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- कवली मेघना (IAS:RR:2021) प्रकल्प संचालक, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड यांची जिल्हा परिषद, नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- करिश्मा नायर (IAS:RR:2021) प्रकल्प संचालक, ITDP, जव्हार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर यांची नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- रणजित मोहन यादव (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, कुरखेडा उपविभाग, गडचिरोली यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली येथे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.