जेएनएन, मुंबई. Maharashtra Farmer Suicide Cases: अनेक वर्षापासून राज्यात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव कायम आहे. गेल्या दोन वर्षापासून शेतकरी आत्महत्याची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. राज्यात एका दिवशी 7 शेतकरी आत्महत्या करत आहे. तर गेल्या दोन वर्षात राज्यात 2 हजार 706 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. दररोज 7 शेतकरी आत्महत्या करत आहे ही बाब राज्यासाठी चिंताजनक आहे.
शेतकरी आत्महत्याचे भीषण वास्तव
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. गेल्या दोन वर्षात 2 हजार 706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. रोज सरासरी 7 शेतकरी आत्महत्या करत असल्याची घटना समोर येत आहे. सर्वात जास्त अमरावती विभागातून आत्महत्याचे प्रमाण आहे. एका वर्षात अमरावती विभागातून 1 हजार 69 शेतकरीने आत्महत्या केली आहे. यामध्ये यवतमाळ, अमरावती, वाशिम, चंद्रपूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - Bird Flu in Solapur: सोलापुरात बर्ड फ्ल्यू शिरकाव, चिकन खरेदी करू नका, जिल्हा प्रशासनाचे निर्देश
ही आहेत आत्महत्येची प्रमुख कारणे
राज्यातील बदलते हवामान, ओला, बोगस बियाणे, कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस, सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीसाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद करत परंतु शेतकरी त्या लाभापासून वंचित राहत आहे. सततची नपिकी होत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला आहे. कर्ज परतफेड करत नसल्याने बँक परत कर्ज देण्यास नकार देत आहे.