BMC Election 2026: सर्वोच्च न्यायालयाने 2022 पूर्वीच्या परिस्थितीनुसार निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेसह सर्व पालिकांच्या निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. राज्यातील महापालिकेसाठी यंदा 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. (Mahanagarpalika election Date)

Municipal Election 2026 राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने सर्व राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. त्यामुळे भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षासह सर्व पक्ष आपल्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात रिंगणात उतरले आहे. आता मतदानाला अवघे 9 दिवस बाकी असल्याने राजकीय पक्षांकडून सभांचा धडाका सुरु आहे. चला या सगळ्या बातम्यांची क्षणाक्षणांची अपडेट घेत राहू….

  • 2026-01-07 19:45:08

    आम्ही चांगलं काम करुन दाखवू -अजित पवारांचा शब्द

    "तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधी मिळेल याची मी खात्री करेन. मी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पालकमंत्री देखील आहे आणि मी तिथूनही काही निधी उपलब्ध करून देईन. आम्ही सीएसआर निधी देखील आणू, आणि हा सर्व पैसा योग्य प्रकारे खर्च होत आहे की नाही यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवू..." असं उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात म्हणाले.  
  • 2026-01-07 19:31:20

    पंतप्रधान मोदी गरिबांना सक्षम बनवत आहेत - भाजप खासदार मनोज तिवारी

    मुंबईत भाजप खासदार मनोज तिवारी यांनी रॅली केली यावेळी जेएनयू कॅम्पसमधील घोषणाबाजीवर मनोज तिवारी म्हणाले, "पंतप्रधान मोदी भारताला मजबूत करत आहेत आणि गरिबांना सक्षम बनवत आहेत. जे लोक कबरी खोदण्याबद्दल बोलतात, ते गरिबांचे शत्रू आहेत..."    
  • 2026-01-07 17:52:40

    रविंद्र चव्हाण यांनी खुलासा करण्याबाबत दिला आदेश

    अकोटमध्ये भाजपाची एमआयएमसोबत युती झाली आहे. यानंतर राज्यात वातावरण तापले आहे. यानंतर, प्रदेशाध्याक्ष रविंद्र चव्हाण यांनी खुलासा करण्याबाबत आदेश दिला आहे.
  • 2026-01-07 16:52:31

    Congress News: 12 नवनिर्वाचित नगरसेवकांना केले निलंबित

    काँग्रेसने (Congress) बुधवारी अंबरनाथ नगर परिषदेतील 12 नवनिर्वाचित नगरसेवकांना आणि त्यांच्या प्रभाग प्रमुखांना पक्षातून निलंबित केले. गेल्या महिन्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर भाजपशी युती केल्याबद्दल काँग्रेसने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

  • 2026-01-07 16:27:59

    नवाब मलिकांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा

    मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. “भाजप ज्या प्रकारे अजित पवार यांना धमकी देत ​​आहे की आम्ही जुनी पाने उघडणार, त्यात बरेच काही बाहेर येईल. तुम्ही ज्या शाईने त्या पानांवर लिहिले होते, ती शाई खोटेपणाची होती. ती पाने उलटून बघा, ती कोरी आहेत. आम्हाला वाटते की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेनेला कडवी झुंज देत असल्यामुळे अशी विधाने केली जात आहेत. आम्ही पूर्ण ताकदीने लढत आहोत आणि जनतेचा पाठिंबा पाहून निराशेपोटी अशी विधाने केली जात आहेत.”  
  • 2026-01-07 16:16:31

    BMC Election 2026: निवडणुकीच्या काळात काही वक्तव्ये केली जातात - सुनील तटकरे

    एनसीपी प्रमुख अजित पवार यांनी आगामी बीएमसी निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. लोकसभा खासदार सुनील तटकरे म्हणाले, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी, तसेच नंतर अजित पवार यांच्याशीही बोललो. आम्ही एनडीएचा भाग आहोत. निवडणुकीच्या काळात काही वक्तव्ये केली जातात, पण येत्या काळात आम्ही एनडीएतील भागीदार म्हणून एकत्र काम करत राहू.”    
  • 2026-01-07 15:36:51

    राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबई महानगरपालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध

    मुंबईच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी योजना आणि जनसहभागासह मुंबईकरांचे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रिसुत्रीनुसार या शहरात सामाजिक सलोखा राहील यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे, असं म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ncp ajit pawar news
  • 2026-01-07 15:21:44

    काँग्रेस, एआयएमआयएमसोबतच्या युतीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले

    महाराष्ट्र: अलीकडील नगरपालिका निवडणुकांमध्ये, भाजपने अंबरनाथमध्ये सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेससोबत, तर अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये एआयएमआयएमसोबत युती केली. या विषयावरील प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, त्यांना तपशिलांची माहिती नाही आणि अधिक माहिती घेतल्यानंतरच यावर बोलता येईल.  
  • 2026-01-07 15:13:36

    एमआयएमसोबत कोणत्या प्रकारे आणि कशासाठी युती - श्रीकांत शिंदेचा भाजपाला सवाल

    नाशिक: खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, ''भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेऊनही त्यांनी एआयएमआयएमसोबत कोणत्या प्रकारे आणि कशासाठी युती केली, हा प्रश्न भाजप नेत्यांना विचारला पाहिजे. भाजपने नेहमीच अशा पक्षांविरुद्ध लढण्याचा दावा केला आहे, परंतु सत्तेच्या लालसेपोटी काही नेत्यांनी पुढे जाऊन युती केली असावी. मला फक्त एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, या युत्या चुकीच्या आहेत.''
  • 2026-01-07 15:05:30

    लाडक्या बहिणींनो तुम्हाला भेटायला आलो आहे बरका - एकनाथ शिंदे

    लाडक्या बहिणींनो तुम्हाला भेटायला आलो आहे बरका असं बोलून एकनाथ शिंदे यांनी अमरावती येथील शिवसेनेच्या विराट जाहीर सभेला सुरुवात केली.  
  • 2026-01-07 13:35:37

    काँग्रेस-भाजपा युतीवर देवेंद्र फडणवीस संतापले

    भाजपने अकोट नगरपरिषदेत एमआयएमसोबत तर अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेससोबत युती केल्याची (BJP Congress Alliance) माहिती समोर आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा -
  • 2026-01-07 13:08:44

    ‘भाजपचे दुटप्पी धोरण’; काँग्रेससोबतच्या युतीवरुन राऊतांची फडणवीसांवर टीकास्त्र

    BMC Election News: "भाजपचे दुटप्पी धोरण आहे... त्यांनी मीरा भाईंदरमध्ये एआयएमआयएमसोबत आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केली आहे," असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले.  
  • 2026-01-07 12:59:40

    BJP Congress Alliance - अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात शिंदेंना भाजपाने (BJP) मोठा धक्का दिला आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत, शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आली पण बहुमतापासून दूर राहिली आहे. कारण, भाजपाने चक्क काँग्रेससोबत (Congress) हातमिळवणी केली आहे. त्यामुळे सर्वात विविध चर्चांना उधाण आले आहे. चला सविस्तर समजून घेऊया… (BJP Congress alliance) सविस्तर वाचा -
  • 2026-01-07 12:29:47

    PMC Election News: पुण्यात अजित पवारांची भव्य रॅली

    PMC Election News: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने पुण्यात एका भव्य निवडणूक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जनवाडी येथून सुरू झालेली आणि शहराच्या विविध भागांतून गेलेल्या या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. या रॅलीला पक्षाचे कार्यकर्ते आणि उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, ज्यामुळे शहरात जोरदार निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले होते.  
  • 2026-01-07 12:22:18

    BMC Election News: बहुप्रतिक्षित राज-उद्धव ठाकरेंच्या सभेचा ठरला मुहूर्त

    ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. अखेर या सभेची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 11 जानेवारी रोजी मुंबईतील शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भव्य सभा पार पडणार आहे. सविस्तर वाचा -