जेएनएन, मुंबई. मुंबईतल्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला. तसंच, त्यांनी तामिळनाडूमधील भाजपा नेते अण्णामलाई यांच्यावरही टीका केली होती. यावर अण्णामलाई यांनी राज ठाकरे यांनी खुलं आव्हान दिलं आहे. 

अण्णामलाई यांच्यावर टीका करताना काय म्हणाले होते राज ठाकरे? 

 तामिळनाडुतून रसमलई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय, भ...व्या तुझा काय संबंध इथं यायचा. यासाठीच बाळासाहेब बोलले होते हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. तुम्हाला कबुतरांच्या नावाने भडकावलं जातंय. कबुतरं बाजूला राहिली पण सत्ताधारी फडफडतायत. जैन मुनी काय सांगतायत जैन आणि मराठी यांच्यातला वाद सोडवण्याची जबाबदारी लोढांवर फडणवीस यांनी दिली पण लोढांनी जैन मराठी वाद वाढेल यासाठी प्रयत्न झाला, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या टीकेवर अण्णामलाई यांचे उत्तर

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजप नेते के. अण्णामलाई म्हणाले, ‘आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे मला धमकी देणारे कोण? मला शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा अभिमान आहे. त्यांनी फक्त माझा अपमान करण्यासाठी सभा घेतल्या आहेत.’

    राज ठाकरेंना आव्हान

    भाजप नेते के. अण्णामलाई पुढे बोलताना म्हणाले की, “मी इतका महत्त्वाचा झालो आहे की नाही, हे मला माहीत नाही... काहींनी लिहिले आहे की मी मुंबईत आलो तर माझे पाय कापतील. मी मुंबईत येणारच—हिंमत असेल तर पाय कापून दाखवा. जर मी अशा धमक्यांना घाबरलो असतो, तर मी माझ्या गावातच राहिलो असतो... जर मी म्हणालो की कामराज हे भारतातील महान नेत्यांपैकी एक आहेत, तर याचा अर्थ ते आता तमिळ राहिले नाहीत असा होतो का? जर मी म्हणालो की मुंबई एक जागतिक दर्जाचे शहर आहे, तर याचा अर्थ ते महाराष्ट्रीयांनी बांधले नाही असा होतो का? हे लोक फक्त अज्ञानी आहेत."

    हेही वाचा -Raj Thackeray Speech: राज ठाकरे यांच्या भाषणातील सर्वात महत्त्वाची मुद्दे… वाचा एका क्लिकवर