जेएनएन, मुंबई.Transport Minister Pratap Sarnaik: मुंबईतील नवीन सोसायटी धारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील सर्व नवीन सोसायटीमध्ये EV चार्जिंग स्टेशन बांधकारक (EV charging station) आहे. EV चार्जिंग स्टेशन नसलेल्या नवीन सोसायटीला ना हरकत प्रमाणपत्र NOC मिळणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
'नाहरकत प्रमाणपत्र' (NOC) मिळणार नाही
राज्य सरकारने मुंबईतील सर्व नव्या इमारतींमध्ये इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन बंधनकारक केले आहे. यापुढे नवीन सोसायटीमध्ये जर इमारतीत EV चार्जिंग स्टेशन नसेल, तर संबंधित इमारतीला 'नाहरकत प्रमाणपत्र' (NOC) मिळणार नाही, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
इमारतींना अधिकृत मान्यता मिळणार नाही
नगरविकास विभागाने विकास नियंत्रण नियमावलीत (DCR) यासंदर्भात आवश्यक दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.भविष्यात बांधकाम व्यावसायिकांना इमारतीचे नियोजन EV चार्जिंग स्टेशनच्या सोयी सहित करावे लागणार आहे. EV चार्जिंग स्टेशन न केल्यास अशा इमारतींना अधिकृत मान्यता मिळणार नाही. त्या नवीन इमारतला NOC मिळणार नाही.
जुन्या आणि अस्तित्वात असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी देखील नवा नियम लागू करण्यात येणार आहे. जुन्या सोसायट्यांमध्ये EV चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एकूण सभासदांपैकी किमान 50 टक्के स्टेशन उभारावे लागणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
हेही वाचा - iPhone आता तुमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर नाचणार! iOS 18 चे हे अद्भुत वैशिष्ट्य वापरले का?
जुन्या आणि नवीन सोसायटीमध्ये EV चार्जिंग स्टेशनबाबत राज्य सरकार कडक निर्णय घेत आहे. नवी सोसायटीमध्ये EV चार्जिंग स्टेशन बांधकारक असणार आहे. तर जुन्या सोसायट्यांमध्ये EV चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एकूण सभासदांपैकी किमान 50 टक्के सभासदांची मान्यता आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकार नवीन नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.