एजन्सी, मुंबई: आचार्य देवव्रत यांनी सोमवारी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.

देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यामुळे सीपी राधाकृष्णन यांनी पद सोडल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या आठवड्यात गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची त्यांच्या स्वतःच्या कर्तव्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची कामे पार पाडण्यासाठी नियुक्ती केली.

सोमवारी राजभवनात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी देवव्रत यांना पदाची शपथ दिली. देवव्रत यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली.

शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर राज्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

66 वर्षीय देवव्रत 2029 पासून गुजरातचे राज्यपाल आहेत. त्यांनी हिंदी आणि इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि निसर्गोपचार आणि योगशास्त्र या विषयात डॉक्टरेट पदवी घेतली आहे. 

आचार्य देवव्रत यांची कारकीर्द! 

    • हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समलखा तहसीलमध्ये जन्मलेले आचार्य देवव्रत हे एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.
    • ते 2019 पासून गुजरातचे राज्यपाल म्हणून काम करत आहेत.
    • याआधी ते 2015 ते 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.
    • आचार्य देवव्रत हे शिक्षणतज्ज्ञ असून नैसर्गिक शेती, पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. 

    हेही वाचा - Thane News: ठाण्यात चाळ कोसळली; 40 फ्लॅट केले रिकामे, अनेक जण जखमी 

    राज्यपाल देवव्रत यांचा अल्प परिचय : 

    • नाव : आचार्य देवव्रत, राज्यपाल, गुजरात
    • वडिलांचे नाव : श्री.लहरी सिंह
    • जन्मदिनांक : 18 जानेवारी 1959
    • पत्ता : राजभवन, सेक्टर–20, गांधीनगर – 382020, गुजरात

    शैक्षणिक पात्रता :

    • पदवीधर, पदव्युत्तर (इतिहास आणि हिंदी), बी.एड.
    • योगशास्त्रातील डिप्लोमा
    • नैसर्गिक चिकित्साशास्त्र व योगिक सायन्समध्ये डॉक्टरेट

    अनुभव :

    • अध्यापन व प्रशासन क्षेत्रात 45 वर्षांचा अनुभव.
    • 12 ऑगस्ट 2015 ते 21 जुलै 2019 या काळात हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून कार्य.
    • या कालावधीत नैसर्गिक शेती, गोसंवर्धन, "बेटी बचाओ-बेटी पढाओ", सामाजिक ऐक्य, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड व जलसंवर्धन अशा कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली.
    • 22 जुलै 2019 पासून गुजरातचे राज्यपाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार. गुजरातमध्येच ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी रासायनिक शेती सोडून नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला.
    • दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. 

    विशेष आवडी :

    • राष्ट्रवादी विचारसरणी व भारतीय संस्कृतीचा प्रसार.
    • वैदिक मूल्ये व तत्त्वज्ञान यांवरील व्याख्याने.
    • वृत्तपत्रे व मासिकांमध्ये लेखन.
    • युवकांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे.
    • योग व वैदिक जीवनशैली लोकप्रिय करण्यासाठी कार्यक्रम.
    • गोधन संवर्धन व नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिरे.
    • एप्रिल 2015 मध्ये "चमन वाटिका इंटरनॅशनल कन्या गुरुकुल" स्थापन.
    • योग, आयुर्वेद व नैसर्गिक उपचार पद्धतींचे प्रशिक्षण व प्रसार.
    • वृक्षलागवड व स्वच्छता मोहिमेद्वारे प्रदूषणमुक्त समाजनिर्मिती.
    • ग्रंथलेखन.

    उल्लेखनीय कार्य :

    • 1981 ते जुलै 2015 पर्यंत गुरुकुल कुरुक्षेत्रचे प्रधानाचार्य.
      या काळात संपूर्ण गुरुकुलाचा कायापालट – आधुनिक सुविधा, नैसर्गिक चिकित्सालय, गोधन संवर्धन केंद्र, 180 एकरवर नैसर्गिक शेती, अर्ष महाविद्यालय, शूटिंग रेंज, इत्यादी.
    • आयआयटी, पीएमटी, एनडीए यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण.

    परदेश प्रवास :

    अमेरिका, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, फ्रान्स, इंग्लंड, इटली, व्हॅटिकन सिटी, नेपाळ, भूतान, सिंगापूर, मॉरिशस, थायलंड इ.

    सन्मान व पुरस्कार (निवडक) :

    • भारत ज्योती पुरस्कार (2003)
    • अमेरिकन मेडल ऑफ ऑनर (2002)
    • ग्रामीण भारतसेवा सन्मानपत्र (2005)
    • जनहित शिक्षक श्री पुरस्कार (2009)
    • हिमोत्कर्ष राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार (2006)
    • अक्षय ऊर्जा पुरस्कार (2011)
    • विशिष्ट सेवा सन्मान, विद्वान रत्न, विविध संस्था व विद्यापीठांकडून मानद डी.लिट. (2023)

    सदस्यत्वे व पदे (माजी/सध्याची) :

    • संस्थापक, चमन वाटिका इंटरनॅशनल कन्या गुरुकुल, अंबाला
    • विविध शैक्षणिक, सामाजिक, कृषी, गोसंवर्धन संस्था व मंडळांमध्ये पदाधिकारी
    • सध्या – गुजरातचे राज्यपाल (22 जुलै 2019 पासून)
    • गुजरात सरकारतर्फे अधिपत्याखालील 24 विद्यापीठांचे कुलगुरू
    • गुजरात विद्यापीठ, एम.एस. युनिव्हर्सिटी बडोदा, गुजरात कॅन्सर सोसायटी, रेड क्रॉस, सैनिक कल्याण मंडळ, स्काऊट्स अँड गाईड्स यांसारख्या संस्थांचे अध्यक्ष/पदाधिकारी

    साहित्यिक कार्य :

    • संपादक – मासिक गुरुकुल दर्शन
    • ग्रंथलेखन : The Priceless Path of Health: Naturopathy, Stairs to Heaven, Valmiki’s Ram-Samvad (अनुवाद), Glorious History of Gurukul Kurukshetra, Natural Farming (हिंदी, इंग्रजी, गुजराती) इ.

    हेही वाचा - Sanjay Raut : अजित पवार मूर्ख राजकारणी अन् अर्धे पाकिस्तानी, त्यांच्यात पाकिस्तानी रक्त वाहते, असे का म्हणाले संजय राऊत?