जेएनएन, मुंबई. Local Body Election:  राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान होणार असून सर्व  नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी उद्या होणार आहे.

उद्या निकाल

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी जाहीर केला होता. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी आज मतदान होणार आहे. सर्व संबंधित ठिकाणी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

अनेक ठिकाणी दोस्तीत कुस्ती!

राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी 21 डिसेंबरला संबंधित ठिकाणी सकाळी 10 वाजता सुरू होईल. सायंकाळपर्यंत सर्व निकाल हाती येतील अशी शक्यता आहे. महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढले.