जेएनएन, मुंबई. Bank Of Maharashtra Employee strike: बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतील शिर्ष संघटनेने आज एक दिवसाचा संप पुकारला आहे. या संपाची मुख्य मागणी आहे ती म्हणजे बँकेत सर्व वर्गामध्ये भरती होणे हा एक कळीचा मुद्दा घेऊन आज कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत, अशी माहिती छत्रपती संभाजी नगरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन कार्याध्यक्ष राजेंद्र देवळे यांनी दिली आहे.
हेही वाचा - Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरण तापले, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेना आमदारांचे मूक आंदोलन
2500 शाखांमध्ये एकही सफाई कर्मचारी नाही
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सध्या साफसफाईसाठी एकही कामासाठी शिपाई नाही. त्या ठिकाणी ऑफिसरला स्वतः पैसे देऊन काम करून घ्यावे लागत आहे. तसेच 700 शाखांमध्ये शिपाई नाहीये आणि 2500 शाखांमध्ये एकही सफाई कर्मचारी नाही. 300 शाखांमध्ये एकही क्लर्क नाही तर या सर्व कर्मचाऱ्यांना आपण कायमस्वरूपी बँकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे ही देखील मागणी आहे, असं राजेंद्र देवळे यांनी सांगितलं.
तसेच माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधित्व कोणी करावं आणि त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी कोणी जावं हा जो हक्क आहे त्या हक्काचा जो निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, ही देखील या मागणी कर्मचाऱ्यांची आहे, असं कार्याध्यक्ष राजेंद्र देवळे यांनी सांगितलं.
एप्रिल महिन्यात दोन दिवसांचा संप
एप्रिल महिन्यात दोन दिवसांचा संप करणार आहेत. आजच्या संपात अधिकारी सहभागी नव्हते. त्यांचा आम्हाला पाठिंबा होता. तर पुढीत संपात सगळे अधिकारीही सहभागी होणार आहेत, अशी माहिती हि त्यांनी दिली.