एजन्सी, नवी दिल्ली. छत्रपती संभाजीनगरमधील खुलदाबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबाच्या करबीचे संरक्षण करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) सतत सक्रिय उपाययोजना करत आहे, असे भारत सरकारच्या वतीनं केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल सांगितले. (Union Minister Gajendra Singh Shekhawat on Aurangzeb Tomb)
केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, ही कबर ASI द्वारे संरक्षित करण्यात आलेली आहे आणि तिच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.
हेही वाचा - Maharashtra Weather Update: राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, आता या भागाला दिला गारपिटीचा इशारा
कबरेच्या संरक्षणासाठी उचललेली पावले
शेखावत म्हणाले की, औरंगजेबाच्या कबरीचे रक्षण करण्यासाठी एएसआय आणि जिल्हा प्रशासन एकत्रितपणे काम करत आहेत. कबरीभोवती 12 फूट उंच लोखंडी पत्रे बसवण्यात आले आहेत. यासोबतच, भिंतींवर काटेरी तार (कॉन्सर्टिना वायर) बसवण्यात आली आहे, जेणेकरून कोणताही अनधिकृत व्यक्ती थडग्यात प्रवेश करू शकणार नाही. तसेच, खाजगी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आणि एएसआय अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी केली जात आहे.
हेही वाचा - Nanded Accident: 10 जणांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळले, 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
ASI वेबसाइटवर माहिती उपलब्ध
केंद्रीय मंत्री म्हणाले की, औरंगजेबाची कबर एएसआयने संरक्षित केली आहे आणि त्याची संपूर्ण माहिती ASI च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. याबद्दलची कोणतीही माहिती काढून टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे स्मारक एएसआयच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात येते आणि त्याच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.