जेएनएन, छत्रपती संभाजीनगर. Aurangzeb Tomb Khuldabad: सध्या मुलघ शासक औरंगजेब याची खुलताबाद येथे असलेल्या कबरीवरुन राज्यात चांगलेच वादांग पटले आहे. काही हिंदुत्ववादी संघटना या कबरीवरुन आक्षेप घेतला असून तिला उकडून ताकण्याचा इशारा दिला आहे. त्याचे पडसाद हे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटलेले आपल्याला दिसले आहेत. मात्र, औरंगजेब याचा मृत्यू हा अहमदनगर सध्याच्या अहिल्यानगर मध्ये झाला. मग त्याची कबर ही खुलताबादेत कशी? हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. त्यामुळे दैनिक जागरणच्या प्रतिनिधीने छत्रपती संभाजीनगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागातील प्रा. संजय पाईकराव यांच्याशी संवाद साधला आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आहेत.

आझम शाह याने खुलदाबाद उभारली कबर

संजय पाईकराव सांगतात की, शेवटचा प्रभावी मुघल शासक मानला जाणाऱ्या औरंगजेबचा मृत्यू 3 मार्च, 1707 साली अहमदनगर सध्याच्या अहिल्यानगर येथे झाला. औरंगजेबचा मुलगा आझम शाह याने खुलदाबाद येथे त्याची कबर उभारली. 

औरंगजेबाची मृत्यूपूर्व इच्छा

खुलदाबाद हे समाधीचे गाव म्हणून ओळखले जाते. आपला दफन विधी खुलदाबाद मधील शेख झैन-उद्-दिन (औरंगजेबचा अध्यात्मिक गुरू) यांच्या दर्गा जवळ करावा, अशी औरंगजेबाची मृत्यूपूर्व इच्छा होती. ही इच्छा त्याच्या मुलाने पुर्ण केली, असं पाईकराव यांनी सांगितलं.  

    औरंगजेबाची मृत्यूपूर्व अशीही इच्छा अशी होती की, त्याची समाधी सुद्धा एकदम साध्या पद्धतीने बांधावी जी त्याच्या स्वकमाई च्या पैशातून असेल. कबर अत्यंत साधी बनवावी, तिच्यावर सब्जाचं झाडं लावावं आणि वरच्या बाजूला छत वगैरे नसावं, असं मृत्यूपत्रात नमुद होतं.त्याच्या इच्छेचा मान ठेवून त्याच्या मुलाने समाधी अवघ्या 14 रुपये 12 आणे इतक्या पैशात उभारली. असं म्हणतात की, हे पैसे औरंगजेबाने स्वतः टोप्या विणून व विकून कमावले होते,  प्रा. संजय पाईकराव यांनी म्हटलं.

    लॉर्ड कर्झनने केली पहिल्यांदा सजावट

    1904-05 च्या दरम्यान लॉर्ड कर्झन आले. आणि त्यांना वाटलं की, इतका मोठा बादशाह आणि त्याची किती साधी कबर कशी काय असू शकते. त्यामुळे मग त्यांनी तिथं मार्बल ग्रिल बांधून कबरीची थोडी सजावट केली, असं छत्रपती संभाजीनगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठतील इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागाती प्रा. संजय पाईकराव यांंनी सांगितलं.