जेएनएन, जालना. नाफेडकडून खरेदीसाठी नियुक्त केलेले खासगी सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरीची लूट प्रकरणात महा-किसान महासंघाने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 3 मार्चला तक्रारदार शेतकारीची आणि जालना जिल्ह्यातील जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी ढोकसाळ सेंटर तालुका मंठा सेंटरची चौकशी करणार असल्याचा रीतसर मेल मराठी जागरण प्रतिनिधीला केला होता. परंतु महा-किसान संघ आणि जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनीने शेतकऱ्यांना चौकशीसाठी मॅसेज किंवा नोटिस पाठवली नाही अशी माहिती तक्रारदार शेतकरीकडून देण्यात आली आहे.
जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनीची चौकशी होणार आहे, असा तक्रारदार शेतकऱ्यांना मेल आला आहे का या विचारणा केल्यानंतर, असा कुठलाही संदेश मिळाला नाही अशी माहिती काही शेतकऱ्यायांनी दिली आहे.
मराठी जागरण प्रतिनिधीला शेतकर्ऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मार्चला काही शेतकरी गेले असता सेंटर बंदच होते अशी माहिती शेतकरीकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीमध्ये महासंघाचा वाटा असल्याचा आरोप ही शेतकरीकडून केला जात आहे. वारंवार जिल्हाधिकारी आणि महा-किसान संघाकडे तक्रार करूनही जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनीवर कारवाई का होत नाही असा संतप्त सवाल शेतकरीकडून विचारला जात आहे.
असे आहे प्रकरण!
महा-किसान संघाने जालना जिल्हातील जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी ढोकसाळ सेंटर तालुका मंठा यांच्या संचालिका सीमा दत्तात्रय अवचर यांना खरेदीचे सह-कंत्राट दिले आहे. जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी ढोकसाळ केंद्रावर शेतकरीकडून गाळणी आणि हमालीच्या नावाखाली १४० रुपये प्रती क्विंटलची वसूली केली जात आहे अशी तक्रारीचा रीतसर मेल जिल्हाधिकारी आणि किसान महासंघांकडे शेतकरीने केला आहे.
काय म्हणाले शेतकरी!
जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी ढोकसाळ केंद्रावर गाळणी आणि हमालीच्या नावाखाली 140 रुपये प्रती क्विंटलची वसूली केली आहे अशी तक्रार शेतकरी आत्माराम जाधव यांनी जिल्हाधिकारी आणि महाकिसान संघाकडे केली आहे. तक्रार करून अनेक दिवस झाले आहे तरीही कुठलीही कारवाई सेंटरवर केली जात नाहीत. आमच्याकडून घेतलेले पैसे कधी परत मिळणार याची वाट गावातील शेतकरी पाहत आहे.
हेही वाचा - डॅनेज पॅलेट प्रकरण: कंत्राटदारानं 31 कोटींची बिल काढल्यावर प्रशासनाला जाग, चौकशी समिती स्थापन
काय म्हणाले महा-किसान संघ!
महा-किसान संघाचे मार्गदर्शक प्रा. जी.एम चिंधे म्हणाले की, आम्ही शेतकरीकडून कुठलेही पैसे आकारत नाही. नाफेडकडून ठरवून दिलेल्या नियमानुसारच खरेदी केली जात आहे. (टीप: महाकिसान संघाकडून अद्याप चौकशीची माहिती आलेली नाही.)
जिल्हाधिकारी म्हणाले...
सोयाबीन खरेदीमध्ये शेतकरीची लूट प्रकरणात चौकशी सुरू आहे. अजून रिपोर्ट आला नाही, रिपोर्ट आल्यानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली आहे.