जेएनएन, मुंबई: महायुतीचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेला अश्लील फोटो पाठविल्याचे बदनामी प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गट खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात विधानसभेत हक्क भंग मांडला आहे. हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे.

विधानसभेमध्ये हक्क भंग मांडला

संजय राऊत आणि रोहित पवार यांनी समाज माध्यमासमोर सरकार आणि वैयक्तिक बदनामी केली आहे असा आरोप गोरे यांनी करत विधानसभेमध्ये हक्क भंग मांडला आहे. 

संजय राऊत यांनी केलेला दावा खोटा

गोरे यांच्यावर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केले होते. संजय राऊत यांनी केलेला दावा खोटा असून या प्रकरणात न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाली आहे. 

मी दोषी असेल तर मला फासावर द्या

    कोर्टाने यामधील असलेली सामग्री नष्ट करण्याचे आदेश ही दिले आहेत, अशी माहिती गोरे यांनी सभागृहात दिली आहे. तसंच, मी दोषी असेल तर मला फासावर द्या, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी सविस्तर चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

    महायुती सरकार आणि माझी वैयक्तिक बदनामी झाली

    संजय राऊत आणि रोहित पवार यांच्याकडून चुकीचे आरोप लावले गेले आहेत. यामुळे महायुती सरकार आणि माझी वैयक्तिक बदनामी झाली आहे. गोरे यांनी प्रकरणात हक्कभंग दाखल करत कारवाई करण्याची मागणी विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे.