जेएनएन, मुंबई. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे. राज्यात महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून 1500 रुपयांचा मासिक हफ्ता देण्यात येतो. ही योजना सुरु ठेवण्यासाठी राज्य सरकारने e-KYC करणे अनिवार्य केलं आहे. या योजनेची e-KYC करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर रोजी आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC तील चुका दुरुस्त करण्याची संधी

e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी 31 डिसेंबर पर्यंत 

सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

    महिला व बालविकास विभाग कटिबद्ध

    या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

    हेही वाचा - Ladki Bahin Yojana: पतीचे निधन झाले असेल तर महिलांनी लाडकी बहीण योजनेत कशी करायची E-kyc? अखेर सरकारनं सांगितलं